Jalgaon News : मक्याचा ट्रक नाल्यात; क्लीनर गंभीर

truck carrying maize in the Kurkure canal overturned jalgaon news
truck carrying maize in the Kurkure canal overturned jalgaon newsesakal

जळगाव : वावडदा (ता. जळगाव) गावाबाहेरील कुरकुरे नाल्यात मका घेऊन निघालेला ट्रक बुधवारी (ता. २२) सायंकाळी उलटला.

या अपघातात क्लीनर गंभीर जखमी झाला असून, चालक फरारी झाला आहे. (truck carrying maize in the Kurkure canal overturned jalgaon news)

मध्य प्रदेशातून मक्याने भरलेला ट्रक (एमपी ३९, यूपी ७२९९) जळगावमार्गे गुजरातकडे निघाला होता. जळगाव सोडल्यानंतर शिरसोलीकडून वावडदा गावानजीक असलेल्या कुरकुरे नाल्यावरून जात असताना, चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट नाल्याच्या खाली कोसळला.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

truck carrying maize in the Kurkure canal overturned jalgaon news
Sparrow Count Activity : राज्यात 31 जिल्ह्यांतून 8 हजार चिमण्यांची नोंद!

या अपघातात क्लीनर संजयकुमार पांडे (वय ३५, रा. बिहार) गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने जखमी क्लीनरला बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले, तर ट्रकचालकाची कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिस नाईक अतुल पाटील प्राथमिक तपास करीत आहे.

truck carrying maize in the Kurkure canal overturned jalgaon news
Jalgoan News : वृद्धेस पाठविले खासगीत; ‘जीएमसी’ उरले नावा पुरतेच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com