Jalgaon Crime News : जळगावातून चोरलेला ट्रक थेट संभाजी नगरात

शहरातील रामनगर भागातून आयशर चोरून पसार झालेल्या चोरट्यास छत्रपती संभाजी नगरातून(औरंगाबाद) येथून अटक करण्यात आली.
truck stolen from Jalgaon was directly in Sambhaji Nagar jalgaon crime news
truck stolen from Jalgaon was directly in Sambhaji Nagar jalgaon crime newsesakal

Jalgaon News : शहरातील रामनगर भागातून आयशर चोरून पसार झालेल्या चोरट्यास छत्रपती संभाजी नगरातून(औरंगाबाद) येथून अटक करण्यात आली. (truck stolen from Jalgaon was directly in Sambhaji Nagar jalgaon news)

एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असतांना गुप्त माहितीवरुन त्याला अटक करण्यात आली असुन जिल्‍हा न्यायालयात हजर केले असता त्याची मंगळवार(ता.९)पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

समीर नसीर खान उर्फ पठाण (४१, रा. पडेगाव, छावणी, छत्रपती संभाजीनगर) असे या संशयीत चोरट्याचे नाव आहे. जळगाव शहरातील राम नगर येथील रहिवाशी जावेद लतिफ पटेल (रा. रामनगर) यांच्या मालकीची आयशर क्रमांक (एमएच १९, सीवाय ४८४६ ) हि ८ डिसेंबरला रामनगर परिसरातील नेहमीच्या जागी खासगी रूग्णालयात समोर उभी होती.

truck stolen from Jalgaon was directly in Sambhaji Nagar jalgaon crime news
Crime: तीन वर्षीय बाळाची अडीच लाखांत विक्री! चौदा तासांमध्ये पोलिसांनी ५ जणांना केली अटक

सकाळ झाल्यावर आयशर ट्रक चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगावातून चेारुन नेलेलेा ट्रक छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील समीर नसीर खान उर्फ पठाण याने चोरून नेल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती.

त्यांच्या गुन्हेशोध पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, छगन तायडे, राहुल रगडे, सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे अशांच्या पथकाने थेट छत्रपती संभाजीनगर गाठून संशयित समीर नसीर खान उर्फ पठाण याच्या मुसक्या आवळल्या. पेालिसी खाक्या दाखवताच त्यांच्याकडून चोरीला गेलेला ट्रक जप्त करण्यात आला.

truck stolen from Jalgaon was directly in Sambhaji Nagar jalgaon crime news
Jalgaon Crime News : वन विभागाच्या कारवाईत 90 हजारांचे लाकूड जप्त; अंधाराचा फायदा घेत चालक वाहन सोडून पसार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com