ग्रामपंचायतीतून TV, CCTV लंपास; ZP शाळेचाही टीव्ही संच लांबविला

यात ३५ हजाराचे साहित्य चोरीस गेले आहे.
Malod Grampanchayat News
Malod Grampanchayat Newsesakal
Updated on

यावल (जि. जळगाव) : तालुक्यातील मालोद ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा व एलईडी टीव्ही आणि कॅमेराचा डिव्हाईस चोरट्यांनी लांबवला आहे. ही घटना शनिवारी ( ता.२८) सकाळी उघडकीस आली. यात ३५ हजाराचे साहित्य चोरीस गेले आहे. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शेजारीच असलेल्या जिल्हा परिषद शाळेचा टीव्ही देखील भामट्यांनी लांबविला आल्याचे निदर्शनास आले आहे. (Malod Grampanchayat News)

मालोद (ता. यावल) या ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत चौक आणि परिसरात होणाऱ्या हालचाली टिपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिव्हाइस ग्रामपंचायत कार्यालय आणि सीसीटीव्हीद्वारे होणाऱ्या हालचाली पाहण्यासाठी एक एलईडी टीव्ही लावण्यात आला होता. ग्रामपंचायत कार्यालयात हे सर्व साहित्य होते. शनिवारी (ता. २८) सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई कुरबान तडवी हे साफसफाई करण्यासाठी गेले असता त्यांना ग्रामपंचायतचा दरवाजा उघडा दिसला व आत जाऊन पहिले तर ग्रामपंचायतीमध्ये बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा, आतील एलईडी टीव्ही व सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर हे जागेवर दिसून आले नाहीत. हे पाहून त्यांनी तातडीने ग्रामसेवक राजू तडवी यांना यासंदर्भात माहिती दिली. श्री तडवी यांनी या ठिकाणी पाहणी केल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक आयपीएस अधिकारी अजित कांबळे, पोलिस कर्मचारी नरेंद्र बागूले हे पथकासह दाखल झाले. त्यांनी या ठिकाणी पाहणी करीत पंचनामा केला. ग्रामपंचायतीतून एकूण ३५ हजाराचे साहित्य चोरट्यांनी लांबविले आहे.

Malod Grampanchayat News
कापसाचे 1 लाख 11 हजाराचे बोगस बीटी बियाणे जप्त

या प्रकरणी ग्रामसेवक राजू तडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार अजित शेख, नरेंद्र बागूले हे तपास करीत आहेत. ग्रामपंचायत लगत जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेत देखील एका शिक्षकाने आपल्या घरातील टीव्ही आणून ठेवला होता. या शाळेत ठेवण्यात आलेला टीव्ही देखील चोरट्यांनी लांबवला आहे. गावात अशा प्रकारे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Malod Grampanchayat News
रेल्वेत चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com