Jalgaon News : राँगसाईड कारने घेतला दोघांचा बळी!; जळगाव-पाचोरा रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ अपघात

Accidental Vehicle
Accidental Vehicleesakal

जळगाव : जळगाव-पाचोरा रस्त्यावर शिरसोलीपुढे रामदेववाडी गावातील हनुमान मंदिरासमोर आज संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास राँगसाईड येणाऱ्या सुसाट कार भरधाव दुचाकीवर धडकून दोन तरुणांचा बळी गेला. राणीचे बांबरुड (ता. पाचोरा) येथील मित्र रफिक हुसेन मेवाती (२३) व अरबाज जहांगीर मेवाती (२०) असे त्या तरुणांची नावे आहेत. (Two killed by wrong side car Accident near Hanuman temple on Jalgaon Pachora road Jalgaon News)

दोघे घराकडे निघाले होते. शिरसोली गाव सोडल्यावर रामदेववाडीजवळच त्याच्या दुचाकीला कारने धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, दोन्ही तरुणांनी जागेवरच प्राण सोडले. एमआयडीसी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार रफिक हुसेन मेवाती हा तरुण दररोज पाचोरा- जळगाव अपडाऊन करून त्याच्या भावंडासह पेरू विक्रीकरून कुटुंबाला हातभार लावत होता. सोमवारी (ता.५) जळगाव शहरातील नेरीनाका परिसरात दिवसभर पेरू विक्री केल्यावर संध्याकाळी साडेसहाला दुचाकीने (एमएच 19 सीएच 4359) त्याचा मित्र अरबाज जहांगीर मेवाती याच्यासोबत घरी जाण्यासाठी राणीचे बांबरुडकडे निघाले होते.

शिरसोली गावाच्या पुढे असलेल्या नवसाच्या हनुमान मंदिराजवळून जात असताना पाचोऱ्याकडून जळगावकडे रॉगसाईडने येणाऱ्या कारने (एमएच १९ बीजे २१७५) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत रफिक मेवाती आणि अरबाज मेवाती दुचाकीसह कारवर आदळले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू ओढवला.

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

Accidental Vehicle
Jalgaon News : कापसाचा दर्जा घसरतोय, वजनातही होतेय घट; 80 टक्के कापूस घरात

ग्रामस्थ-पोलिसांची धाव

अपघात झाल्यावर रामदेव वाडी ग्रामस्थांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मिळेल त्या वाहनाने दोन्ही तरुणांना जळगावी रवाना केले. जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यावर मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर कारचालत कार सोडून पळून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

व्हॉटस्‌ॲपवर भावाला फोटो

रफिक मेवाती याचा भाऊ सलीम याला त्याच्या ओळखीच्या एकाने अपघात स्थळावरून वाहनांसह दोघांचे फोटो पाठवून तुझी गाडी आहे का, अशी विचारणा केली. मात्र, वाहन त्याचे नसल्याने त्याने नकार दिला. थोड्यावेळात दोघा तरुणांचे फोटो टाकल्यावर मात्र, त्याचे अवसान गळाले. नातेवाईक कुटुंबीय आणि ग्रामस्थांना घेऊन त्याने तातडीने जिल्हा रूग्णालय गाठले.

Accidental Vehicle
Jalgaon Milk Union Election : तालुकानिहाय मेळावे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

सेहरा बांधण्यापूर्वीच...

रफिक मेवाती याला तीन भाऊ व एक बहीण, आईवडील असा परिवार आहे. गेल्या आठवड्यात त्याच्यासाठी कुटुंबीयांनी मुलगी पाहिली होती. लवरच लग्न आटोपू अशी कुटुंबात चर्चा सुरू असताना आज अचानक या परिवारावर रफीकच्या मृत्यूने अनाहूत संकट कोसळले. भावाच्या मृत्यूने गांगरून गेलेल्या भावाला नेमके करावे काय हेच सुचेनासे झाले होते.

नव्या स्टार्टअप पूर्वीच..

अरबाज तसा खूप मेहनती तरुण होता. मोलमजुरी करुन तो कुटुंबाला हातभार लावत असे. तीन भाऊ आईवडील अशा कुटुंबात धडपड्या तरुण म्हणून तोच अग्रेसर असायचा. त्याने नुकतेच पंधरा दिवसांपूर्वी आयशर ट्रक कर्जावर घेण्याचा बेत आखून नवा स्टार्टअप तो सुरु करणार होता. याच कामानिमीत्त तो औरंगाबादला गेला होता. तेथून जळगावी परतला. मित्र रफिकची भेट घेत दोघेही संध्याकाळी घराकडे निघाले असताना क्रूरकाळाने त्यांच्या स्वप्नांसह दोघांवर झडप घातल्याचे मित्रपरिवाराच्या चर्चेतून समोर आले.

Accidental Vehicle
Jalgaon Milk Union Election : सासू-सासऱ्याच्या पॅनलविरुद्ध सुनेचा प्रचार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com