जळगाव : विहिरीत पडलेल्या महिलेचे दोन तरुणांनी वाचविले प्राण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drowned in Well

जळगाव : विहिरीत पडलेल्या महिलेचे दोन तरुणांनी वाचविले प्राण

अमळनेर (जि. जळगाव) : शेळीसाठी चारा गोळा करायला गेलेली महिला पाय घसरून विहिरीत पडल्याची घटना सोमवारी (ता. ४) सायंकाळी सहाला घडली. मात्र नगरसेवकासह दोन तरुणांनी वेळीच धाव घेतल्याने महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले.

दोघा तरुणांचे कौतुक

मंगलाबाई महाले (रा. राजारामनगर) ही महिला शेळीसाठी चारा घ्यायला शहराच्या वाढीव हद्दीतील त्रिमूर्तीनगरात गेली असताना कठडे नसलेल्या विहिरीत पाय घसरून विहिरीत पडली. त्याच वेळी सायंकाळी फिरायला गेलेल्या राकेश महाजन याला ही घटना नजरेस पडली. त्याने नगरसेवक प्रताप शिंपी यांना फोन केला. तेदेखील फिरायला आलेले असल्याने त्यांनीही धावत जाऊन विहीर गाठली. महिला डुबक्या मारू लागताच तिने पाइप हातात धरून ठेवला होता. विहिरीतून बाहेर येणे अवघड होते. जवळच असलेल्या पुंडलिक महाले, संजू नाईक यांना बोलावून विहिरीत उड्या टाकायला सांगितल्या. ताबडतोब दोर व जेसीबी मशिन मागविण्यात आले. रवी ठाकूर, सूरज शिंपी, हर्षल पाटील, मधुकर चौधरी, अमोल चौधरी हे देखील मदतीला धावले. अतिशय अवघड विहिरीतून महिलेला बाहेर काढले. त्यानंतर दोन्ही युवकांनादेखील काढण्यात आले. महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल दोघा तरुणांचे कौतुक होत असून, त्यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा: जळगाव : मेंदूच्या डॉक्टराअभावी रुग्णाचा मृत्यू

हेही वाचा: जळगाव : सायबर गुन्हेगारांनी शेतकऱ्याला फसवले

Web Title: Two Youths Saved The Life Of A Woman Who Fell Into A Well

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonLifeWoman
go to top