
Jalgaon News : उमवि अधिसभा पदवीधर निवडणूक; मतदान प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधर गटामधून निवडून द्यावयाच्या १० सदस्यांसाठी येत्या रविवारी (ता. २९) मतदान होणार असून, सोमवारी या मतदान प्रक्रियेसंदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. (UMVI Adhisabha Graduate Election on 29 january while Training of staff on voting process jalgaon news)
रविवारी जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रावरील ६० बूथवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे.
साडेचारशे जण प्रक्रियेत
या निवडणूक प्रक्रियेसाठी जवळपास ४५० अधिकारी व कर्मचारी काम करणार आहेत. यात ९ विभागीय अधिकारी, ८ क्षेत्रिय अधिकारी, ६० केंद्राध्यक्ष आणि जवळपास ३७० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
हेही वाचा: Balasaheb Thackeray Jayanti: प्रतिमापूजनावरून ठाकरे, शिंदे गटात धुसफूस
सोमवारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी सिनेट सभागृहात कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती देऊन शंकांचे निरसन केले.
प्रत्येक मतदान केंद्रात २ ते ४ मतदान अधिकारी व मतदान सेवकांची नियुक्ती केली असून, प्रत्येकाची जबाबदारी काय असेल, यासंदर्भात डॉ. विनोद पाटील यांनी मार्गदर्शन केले.
सहा प्रकारच्या मतपत्रिका राहणार असून, मतपत्रिकेवर पसंतीक्रमानुसार मतदान केले जाईल. निवडणूक विभागप्रमुख इंजिनिअर आर. आय. पाटील, डॉ. मुनाफ शेख उपस्थित होते.
हेही वाचा: Maharashtra Chitrarath: प्रजासत्ताक दिनाची जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात