Jalgaon : सोनीनगरातील अनधिकृत अतिक्रमण काढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unauthorized encroachment removed

Jalgaon : सोनीनगरातील अनधिकृत अतिक्रमण काढले

जळगाव : महानगरपालिका (JMC) हद्दीतील पिंप्राळा शिवारातील सोनीनगरात अनेकांनी ९ मीटरच्या रस्त्यावर अनधिकृत सिमेंटचे ओटे बांधले होते. याबाबत परिसरातील महिलांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची भेट घेत आपबीती सांगितली असता उपमहापौर पाटील यांनी तत्काळ याची दखल घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करताच त्वरित जेसीबीच्या सहाय्याने ते अतिक्रमण (Encroachment) काढण्यात आले. (Unauthorized encroachment removed in Soninagar Jalgaon News)

हेही वाचा: नाशिक : वीजपुरवठा खंडित करून चोरट्यांनी फोडली दानपेटी

सोनीनगरात अनेकांनी ९ मीटरच्या रस्त्यावर अनधिकृत सिमेंटचे ओटे बांधले होते. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच येण्या-जाण्यासाठी देखील जागा शिल्लक नसल्याने अनेकांना याचा त्रास होत होता. त्यामुळे याबाबत परिसरातील महिलांनी उपमहापौर पाटील यांची भेट घेऊन आपबीती सांगितले असता उपमहापौर पाटील यांनी तत्काळ दखल घेतली. सोनीनगरातील महिलांना भेटून पाहणी केली असता उपमहापौर म्हणाले की, ९ मीटरच्या रस्त्यावर ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केले आहेत ते नियमाने काढण्यात येईल. त्यावेळी नागरिकांनी होकार दिल्यानंतर उपमहापौर पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अतिक्रमण काढण्याची सूचना करून अतिक्रमण काढले.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

Web Title: Unauthorized Encroachment Removed In Soninagar Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..