Unseasonal Rain : अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही नुकसान; वीजांचा भितीदायक कडकडाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

unseasonal rain Hail have caused heavy damage to rabi crops jalgaon news

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही नुकसान; वीजांचा भितीदायक कडकडाट

जळगाव : शहरासह जिल्ह्यात १८ मार्चपर्यंत विजांचा कडकडाटासह गारांचा पाऊस (Unseasonal Rain) पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

त्यानुसार बुधवारी (ता. १५) रात्री एक ते दीडच्या सुमारास तब्बल अर्धा तास विजांचा कडकडाट सुरू होता. (unseasonal rain Hail have caused heavy damage to rabi crops jalgaon news)

जोरदार वाऱ्यानंतर काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी (ता. १४) दिवसा विजांसह जोरदार पावसाने जिल्ह्यातील काही भागांत हजेरी लावली. बुधवारी दिवसा ढगाळ वातावरण होते. मध्यरात्रीनंतर मात्र तब्बल अर्धातास विजांचा कडकडाट झाला. त्यात वीजपुरवठा खंडित झाला होता.

काही ठिकाणी वीजतारा तुटल्या, तर काही झाडांच्या फांद्याही तुटल्या. ग्रामीण भागात घरावरील पत्रे उडाली. विजांचा कडकडाटानंतर जोरदार पाऊस झाल्याने अनेक सखल भागात पाणी साचले होते. गहू, हरभरा, केळी, लिंबू पिकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

अवकाळी पाऊस रब्बी हंगामासाठी नुकसानदायक ठरत आहे. अनेकांचा गहू, हरभरा काढणीवर आला आहे. अवकाळी पावसाने त्याचे नुकसान झाले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी शेतात पोचलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कशी मिळणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.