Jalgaon : औषध व्यापाऱ्याच्या घरावर अयशस्वी दरोड्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Crime News

Jalgaon : औषध व्यापाऱ्याच्या घरावर अयशस्वी दरोड्याचा प्रयत्न

जळगाव : शहरातील जिल्‍हापेठ भागात वास्तव्यास असलेल्या होलसेल औषध व्यापाऱ्याच्या (Wholesale Medicine dealer) घरावर रात्री पाच ते सहा दरोडेखोरांनी (Robbers) हल्ला चढवला. तरुण मुलगी व पत्नीला मारहाण करतानाच शेजाऱ्यांनी आरडाओरड केल्याने सावध दरोडेखोरांनी पळ काढला. (Unsuccessful robbery attempt on Medicine dealers house Jalgaon crime news)

हेही वाचा: संत मुक्ताबाई पालखीचे जळगावातून पंढरपूरला प्रस्थान; पाहा PHOTOS

शहरातील जिल्‍हापेठ भागात प्लाट नं. २७३ येथे अशोक जैन हे औषधाचे होलसेल व्यापारी वास्तव्यास आहेत. सोमवारी रात्री जैन पावभाजी आणायला गेले असताना यांची मुलगी रिद्धी (वय २७) आणि पत्नी उर्मिला घरात एकटेच असताना दरोडेखोरांनी मुख्य दाराची बेल वाजवल्याने मुलीने विचारणा केल्यावर, ‘मी दुधवाला आहे’ असे सांगितल्याने तिने दार उघडताच एकाने तिचा गळा दाबून धरल्यावर तिची आई ऊर्मिला या धावत आल्यावर चार ते पाच अनोळखी तरुणांनी ऊर्मिला यांना धरुन खाली पाडत मारहाणीचा सुरवात केली. ओरड केल्याने शेजाऱ्यांना काहीतरी विपरीत घडल्याची जाणीव झाल्याने त्यांनी मदतीला धाव घेतली. दरोडेखोरांनी आतून दार लावून घेतल्याने त्यांचा नाइलाज झाला. घरात शिरलेल्या ६ चोरट्यांनी धूम ठोकली. रिद्धी जैन यांच्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

हेही वाचा: विठ्ठलाच्या भेटीला मुक्ताबाई निघाली पंढरीला

Web Title: Unsuccessful Robbery Attempt On Medicine Dealers House Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top