esakal | बहिणाबाई चौधरी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी दिला राजीनामा

बोलून बातमी शोधा

बहिणाबाई चौधरी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी दिला राजीनामा }

तब्बल आठ महिने आधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. अचानक राजीनाम्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली..

बहिणाबाई चौधरी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी दिला राजीनामा
sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी. पी. पाटील यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. तो मंजूर करण्यात आला आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायूनंदन यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला आहे. 

आवश्य वाचा- ‘भाजप’चक्काजाम आंदोलनास उतरले; आणि पोलिसांनी प्रयत्न उधळला 
 

कुलगुरू डॉ. पाटील यांनी ९ फेब्रूवारीस राजीनाम्याची नोटीस राज्यपालांकडे पाठविली होती. १६ राजीनामा राजभवनात पोचला. तो काल मंजूर झाला आहे. राज्यपालांनी राजानामा मंजूर करून डॉ.ई वायुनंदन यांच्याकडे पदभार सुपूर्त करण्याचे आदेश दिले आहेत. कुलगुरू पाटील यांचा कार्यकाळ 25 ऑक्टोबर २०२१ मध्ये पूर्ण होत आहे. तब्बल आठ महिने आधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. अचानक राजीनाम्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून राजीनाम्याबाबत तर्कविर्तकांना उधाण आले आहे. 

स्वास्थ चांगले नसल्याचे कारण

प्रकृती स्वास्थ्य चांगले नसल्याकारणाने राजीनामा दिला असल्याचे कुलगुरू डॉ.पाटील यांनी सांगितले असले तरी त्यांच्यावर राजकीय दबाब, सिनेट सदस्यांकडून होणारा त्रास आदी कारणांमुळे राजीनामा दिल्याची चर्चा आज शैक्षणिक वर्तुळात होती. 
 

आवर्जून वाचा- ‘खाकी’च्या सतर्कतेमुळे वाचला दिव्यांग दांपत्याचा जीव !

 प्रा. वायुनंदन यांचा परिचय 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र  मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन हे प्रभारी कुलगुरू म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची सुत्रे ८ मार्चला स्वीकारणार आहेत. डॉ. वायुनंदन यांनी मार्च २०१७ मध्ये मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सुत्रे स्वीकारली आहेत. तत्पुर्वी ते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात १९८७ पासून कार्यरत होते. आपत्ती व्यवस्थापन या विषयात त्यांनी पदविका घेतली असून लोकप्रशासन या विषयात त्यांनी पीएच.डी. केलेली आहे. २५ वर्षाचा त्यांना अध्यापनाचा अनुभव आहे. पाच पुस्तके त्यांनी लिहीलेली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केलेले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे शोधनिबंध प्रसिध्द झालेले आहेत. प्रशासन, कामगार प्रशासन आणि सार्वजनिक धोरण हे त्यांचे संशोधनाचे विषय आहेत. आपत्ती व्यवस्थापना बाबतच्या विविध उपक्रमात त्यांनी बहुमोल योगदान दिलेले आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे