VIDEO - आमदाराने पोलिसांच्या वसुलीचा केला पर्दाफाश; वेषांतर करून स्टिंग ऑपरेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO - आमदाराने पोलिसांच्या वसुलीचा केला पर्दाफाश

यात मंगेश चव्हाण यांनी घडलेला प्रकार सोशल मिडीयावर व्हिडिओच्या माध्यामातून शेअर केला आहे.

VIDEO - आमदाराने पोलिसांच्या वसुलीचा केला पर्दाफाश

जळगावातील चाळीसगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील कन्नड घाटात पोलिसांकडून चक्क वसुली सुरु आहे. दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद असलेल्या कन्नड घाटात पोलिसांकडून ५०० ते १००० रुपये प्रति अवजड वाहनांना सोडण्यात येते. यामुळे अनेकदा घाट जाम होऊन ५ ते १० तास घाट जाम होतो. पोलिसांच्या या कृत्यामुळे या घाटांत गंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या एम्ब्युलन्स तासंतास अडकून पडतात. यामुळे पूर्ण राज्यात चाळीसगाव तालुक्याचे नाव खराब होत आहे. केवळ वसुलीसाठी प्रवाश्यांच्या जीवाशी सुरू असलेल्या खेळाचा आमदार मंगेश चव्हाण यांनी स्टिंग ऑपरेशन करत पर्दाफाश केला गेला. यासंबधित त्यांनी सोशल मिडीयावर घटनेचा व्हिडीओ आणि पोस्ट व्हायरल केला आहे.

यात मंगेश चव्हाण यांनी घडलेला प्रकार सोशल मिडीयावर व्हिडिओच्या माध्यामातून शेअर केला आहे. महावसुली आघाडी सरकारच्या आशिर्वादाने चाळीसगाव तालुक्यातील अवजड वाहनांसाठी बंद असलेल्या कन्नड घाटात पोलिस ट्रक चालकांकडून पैसे वसुली करतात याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. याची खातरजमा करण्यासाठी आमदार सहकाऱ्यांसह रात्री वेषांतर करत स्टिंग ऑपरेशसाठी गेले. यावेळी त्यांनी स्वतः अजवड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला असता, तेथील पोलिसांनी जाताना व येताना ५०० रुपयांची मागणी केली असता. ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले. बाकी पैसे परत मागितले असता सदर पोलिसाने ते देण्यास नकार दिला. तेव्हा त्यातील एक पोलिसाने शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावेळी खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांना ते आमदार असल्याचे ओळखले व पळ काढला.

हेही वाचा: उद्धव ठाकरे हेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहणार; संजय राऊत

सचिन वाझे जेलमध्ये गेल्याने १०० कोटींचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणी अश्या वसुल्या सुरु आहेत की काय अशी शंका येणारी परिस्थिती आहे. एकीकडे चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांचे गुरे चोरीला जात असताना तिथे बंदोबस्त करायला पोलिसांना वेळ नाही. महावसुली आघाडी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडत आहेत. १५ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी संपाकडे कानाडोळा करतात मात्र पोलिसांच्या मार्फत महावसुली जोरात सुरु आहे, असा टोला महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

आज जिल्हा पोलिस अधिक्षक महोदय यांनी सदर घटना व माझ्या तक्रारी च्या अनुषंगाने जळगाव येथे सर्व प्रमुख पोलिस अधिकारी यांची बैठक बोलावली असून मी त्याठिकाणी चाळीसगांव तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे, हफ्ता वसुली, शेतकऱ्यांचे गुरे चोरी जाण्याचे वाढलेले प्रमाण, घरफोडी, चोरी, महिला व अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार या अनुषंगाने चाळीसगांव वासीयांच्या वतीने माझी भूमिका मांडणार आहे.

- आमदार मंगेश रमेश चव्हाण

हेही वाचा: पोटनिवडणूक लढणार की बिनविरोध? काँग्रेस-भाजप निर्णयाकडे लक्ष

loading image
go to top