Vidhan Parishad Election : निखिल-मनीष जैन यांच्यातील लढत; कोटींच्या व्यवहाराची राज्यभर चर्चा

विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकार मतदारसंघातील निवडणूक नेहमीच राज्यभरात चर्चेचा विषय ठरलीय.
Vidhan Parishad Election

Vidhan Parishad Election

sakal
Updated on

जळगाव - विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकार मतदारसंघातील निवडणूक नेहमीच राज्यभरात चर्चेचा विषय ठरलीय. गेल्या काळातील लढतींमध्ये सर्वांत गाजलेली निवडणूक म्हणून २०१० मध्ये निखिल खडसे व मनीष जैन यांच्यात झालेली लढत. या निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून कोट्यवधींचा खर्च झाल्याची चर्चा राज्यात रंगली होती. या निवडणुकीत एकनाथ खडसेंचे पुत्र निखिल यांचा पराभव झाला आणि इथेच खडसे- सुरेशदादा जैनांमध्ये वादाची ठिणगी पडून दोघांमध्ये टोकाची ‘दुष्मनी’ सुरू झाली.

२०१० मध्ये भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून निखिल खडसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मनीष जैन यांच्यासह अपक्ष उमेदवार म्हणून अनिल चौधरी अशी तिरंगी लढत होती. खरी लढत निखिल खडसे व मनीष जैन यांच्यात होईल, असे मानले जात होते. झालेही तसेच.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com