Latest Marathi News | जळगाव : वाकोद ग्रामस्थांनी पकडला गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Latest Marathi News

जळगाव : वाकोद ग्रामस्थांनी पकडला गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो

जळगाव : जळगाव-औरंगाबाद राज्य महामार्गावर वाकोद ग्रामस्थांनी पाठलाग करून लाखो रुपयांचा गुटखा वाहून नेणारा टेम्पो पकडला. माहिती कळवूनही पहूर पोलिसांनी पोचण्यास विलंब केल्याने चालकाने वाहन सोडून धूम ठोकली. (Latest Marathi News)

हेही वाचा: Crime News : दारूचा ग्लास सांडल्याच्या रागातून एकाचा खून

जळगाव-औरंगाबाद राज्य महामार्गावर पहूर ते वाकोददरम्यान जळगावकडून येणारा महिंद्रा पिकअप टेम्पो (एमएच १९, सीवाय ६८८१) गुटख्याची तस्करी करीत असताना, वाकोद ग्रामस्थांना आढळून आला. काही तरुणांनी टेम्पोचा पाठलाग त्याला पकडले. पहूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र, पोलिस वेळेवर घटनास्थळी पोचू न शकल्याने चालकाने गुटख्याचे वाहन सोडून पळ काढला.

हेही वाचा: धावत्या एसटी बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका; मृत्यूपूर्वी वाचवले २५ जणांचे प्राण

घडल्या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना विचारणा केली असता, पहूर पेालिसांनी तुम्हीच वाहन अडविले असेल, तर तुम्हालाच तक्रारदार व्हावे लागेल, असा दम भरला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा मात्र दाखल झाला नव्हता. माहिती घेतल्यावर पकडण्यात आलेल्या गाडीतील गुटखा जळगावातील कुकरेजा यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Villagers Caught A Tempo Transporting Gutkha In Jalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonCrime News