धावत्या एसटी बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका; मृत्यूपूर्वी वाचवले २५ जणांचे प्राण

हृदयविकाराचा झटका येऊनही मृत्युपुर्वी त्यांनी वाचवले 25 प्रवाशांचे प्राण
Driver died while driving ST Pune Satara Highway Despite suffering heart attack he saved 25 passengers
Driver died while driving ST Pune Satara Highway Despite suffering heart attack he saved 25 passengerssakal

नसरापूर : मुंबई वसई येथुन म्हसवड कडे चाललेल्या एस टी बस वरील चालकाला पुणे सातारा महामार्गावर वरवे गावच्या हद्दीत चक्कर येऊन हृदयविकाराचा झटका आला परंतु अशाही परिस्थितीत चालकाने एस टी बस रस्त्याच्या एका बाजुला घेऊन प्राण सोडले,मृत्युसमयी देखिल चालकाने दाखवलेल्या या प्रसंगावधनाने बस मधील 25 प्रवाशांचे प्राण वाचले मात्र चालकाच्या मृत्यु मुळे सर्वांनीच हळहळ व्यक्त केली.

जालिंदर रंगराव पवार वय 45 रा.पळशी ता.खटाव जि.सातारा असे मृत्यु पावलेल्या चालकाचे नाव असुन ते ता.3 रोजी वसई आगारातुन एस टी बस क्र.एम एच 14 बी टी 3349 घेऊन म्हसवड सातारा येथे चालले होती दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा महामार्गावर वरवे गावच्या हद्दीत बस आली असताना बसचा वेग अचानक मंदावला असता पवार यांचे सहकारी वाहक संतोष गवळी यांनी पवार यांना विचारणा केली असता मला चक्कर येत आहे असे म्हणुन पवार यांनी बस रस्त्याच्या बाजुला घेऊन थांबवली व बसच्या स्टेअरींगवर डोके ठेऊन त्यांनी प्राण सोडले वाहक संतोष गवळी यांनी काय होते आहे तुम्हाला म्हणुन आवाज दिला परंतु त्यांचा प्रतिसाद न आल्याने वाहक गवऴी यांनी प्रवाशांच्या मदतीने पवार यांना बाजुला घेऊन स्वतःहा बस चालवत नसरापूर येथील सिध्दिविनायक हाँस्पिटल मध्ये त्यांना उपचारासाठी नेले परंतु उपाचारापुर्वीच त्यांचा मृ्त्यु झाल्याचे डाँक्टारांनी सांगितले.

जालिंदर पवार हे यांना बदली चालक म्हणुन आले होते वसई येथुन बस दुपारी साडेबारा वाजता बस स्वारगेट येथे आल्यावर तेथुन पुढे पवार यांनी बस चालवण्यासाठी घेतली होती खेड शिवापुर टोलनाका पार केल्यावर ते काहीसे अस्वस्थ झाले होते त्यामुळे बसचा वेग मंदावला होता वरवे गावच्या हद्दीत आल्यावर त्यांना जास्त त्रास झाल्याने बस बाजुला घेतली यावेळीच हृदयविकाराच्या जोरदार झटक्याने त्यांचे निधन झाले परंतु त्यांनी दाखवलेल्या प्रसंगवधनाने बस मधील 25 प्रवाशांचा प्राण वाचले त्याच बरोबर धावत्या महामार्गावर नियंत्रण सुटुन इतर वाहनांचा देखिल मोठा अपघात झाला असता ती दुर्घटना देखिल पवार यांच्या समयसुचकतेमुळे वाचली. या घटने बाबत वाहक (कंडक्टर) संतोष गवळी यांनी राजगड पोलिस ठाण्यात खबर दिली असुन पोलिसांनी याची नोंद घेऊन शवविच्छेदना नंतर मृतदेह पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com