Jalgaon News : वाळू ठेक्याविरोधात तांदळवाडीत ग्रामस्थ एकवटले; प्रांत अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट विरोध

Tandalwadi (Dt. Chopra): Sarpanch Sindhu Bhil, Upasarpanch Pintu Dhangar, Deepak Patil etc. during a discussion with the villagers in the village council.
Tandalwadi (Dt. Chopra): Sarpanch Sindhu Bhil, Upasarpanch Pintu Dhangar, Deepak Patil etc. during a discussion with the villagers in the village council.esakal

अडावद (ता. चोपडा) : येथील ग्रामपंचायतीमार्फत गुरुवारी (ता. १२) ग्रामसभा घेण्यात आली. प्रांत अधिकारी सीमा अहिरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या ग्रामसभेत वाळू ठेका देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. आचारसंहिता असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या ग्रामसभेत फक्त वाळू ठेक्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. मागील ग्रामसभेत वाळू ठेका न देण्यासंदर्भात ठराव पाठविण्यात आला होता. त्यात प्रांत अधिकाऱ्यांनी वाळूविरोधात ठेका न देण्याचे कारण विचारले असता ग्रामस्थांनी येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला. (Villagers unite in Tandulwadi against sand contract Killer opposition to provincial authorities Jalgaon News)

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

Tandalwadi (Dt. Chopra): Sarpanch Sindhu Bhil, Upasarpanch Pintu Dhangar, Deepak Patil etc. during a discussion with the villagers in the village council.
Nashik Accident News : सिन्नर शिर्डी महामार्गावर बस व ट्रक ची धडक झाल्याने भिषण अपघात

यात पाण्याची पातळी, कूपनलिकांचे पाणी आटणे, वाळू उपसा झाला तर पाण्याची पातळी कमी होते, सर्व रहदारी रस्ता गावातून आहे. उन्हाळ्यात तापी नदीची पाण्याची पातळी कमी होऊन आमच्या कूपनलिकांचे पाणी कमी होते.

गावातील सर्व कूपनलिकांचे पाणी ७० फुटांवर होते. आता १६० पेक्षा जास्त आहे. आतापर्यंत बऱ्यापैकी वाहत आहे, पण वाळू ठेका दिल्यामुळे बारमाही वाहणारी नदी जानेवारीतच कोरडी पडते. अशा अनेक विषयांवर चर्चा करून वाळू ठेका देण्यास स्पष्ट विरोध केला.

या वेळी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तलाठी कल्पेश कुवर, ग्रामसेवक भय्यासाहेब साळुंखे, सरपंच सिंधू भिल्ल, उपसरपंच पिंटू धनगर, दीपक पाटील, देवेंद्र पाटील, विनोद धनगर, सुनील पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tandalwadi (Dt. Chopra): Sarpanch Sindhu Bhil, Upasarpanch Pintu Dhangar, Deepak Patil etc. during a discussion with the villagers in the village council.
Akola News: महानगरपालिका हद्दीतील रस्ते विकासाचा असमतोल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com