Voter ID-Aadhar Linking मोहीम आजपासून; Online, Offline पध्दतीचा अवलंब होणार | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Linking Of aadhar & voter ID latest marathi news

Voter ID-Aadhar Linking मोहीम आजपासून; Online, Offline पध्दतीचा अवलंब होणार

जळगाव : भारत निवडणूक आयोगाच्या ( Election Commission of India) शिफारशीनुसार केंद्र, विधी व न्याय मंत्रालयाने १७ जुलैला लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा केली असून, मतदानकार्ड आधार क्रमांकाशी संलग्न (लिंक) करण्याची मोहीम उद्या(ता. १)पासून सुरू होत आहे.

नागरिकांना आधार लिंकिंग ऑनलाईन करता येणार आहे. किंवा घरोघरी येणाऱ्या ‘बीएलओ’द्वारेही करता येणार आहे. (Voter ID Aadhar Linking Campaign From Today Jalgaon Latest Marathi News)

ऑनलाइन पद्धतीने आधार लिंक करण्यासाठी अर्ज ६ ‘ब’ ईआरओएनईटी, जीएआरयूडीए ॲप, एनव्हीएसपी, व्हीएचपी या पोर्टलचा वापर करता येणार आहे. मतदाराचा आधार क्रमांक गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

आधारकार्ड उपलब्ध नसल्यास मतदारांना नावाचे प्रमाणीकरण करण्यासाठी व दुबार नोंदी टाळण्यासाठी कोणतेही ओळखपत्र सादर करणे गरजेचे आहे. ऑफलाइन पद्धतीने ‘बीएलओ’कडे ओळखपत्र जमा करावयाची आहे.

१ ऑगस्ट २०२२ ते १ एप्रिल २०२३ दरम्यान मतदान कार्डाला आधार लिंकिंगची मोहीम सुरू राहील. मतदान कार्डाला आधार लिंक करणे ऐच्छिक असले तरी आधार लिंक करण्याने मतदाराला त्याच्या मोबाईलवर थेट मतदार लिस्ट, मतदान केंद्र व क्रमांक येईल, मतदान कार्डही तो ऑनलाइन काढू शकेल. सोबतच शासनाच्या विविध योजनांच्या माहितीचा संदेश पाठविला जाणार आहे.

हेही वाचा: ‘भोसरी’ प्रकरणी तथ्य नसतांनाही चौकशी करून छळण्याचा प्रयत्न : एकनाथ खडसे

६ ‘ब’ अर्जाद्वारे संलग्न

पूर्वी मतदान नोंदणी, दुरुस्ती, नाव काढणे, पत्ता बदल करण्यासाठी नमुना अर्ज १, २, २ अ, ३, ६, ७, ८, ११, ११ अ, ११ ब, १८, १९ वापरले जात होते.

आता नवीन बदलानुसार आधार संलग्न करण्यासाठी ६ ‘ब’ अर्ज निश्‍चित करण्यात आला आहे. घर स्थलांतर झाले, मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ईपीक कार्ड बदलण्यासाठी, दिव्यांग मतदार चिन्हांकित करण्यासाठी नमुना अर्ज ८ वापरण्यात येणार आहे.

आजची मतदारसंख्या

पुरुष मतदार--१७ लाख ९९ हजार १६१

महिला मतदार--१६ लाख ५५ हजार ३४३

तृतीयपंथी मतदार--१११

एकूण मतदार--३४ लाख ५४ हजार ६१५

विधानसभा मतदारसंघ --११

हेही वाचा: भोसरी भूखंड : खडसेंच्या अडचणी वाढणार, महाजनांचं सूचक विधान

Web Title: Voter Id Aadhar Linking Campaign From Today Jalgaon Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top