Jalgaon Voter List : मराठी यादीत बंगाली भाषेत मतदाराचे नाव

Voter's name printed in Bengali language in the electoral roll of the city.
Voter's name printed in Bengali language in the electoral roll of the city.esakal

Jalgaon Voter List : मतदारयादीत सर्व नावे मराठीत असताना केवळ एका मतदाराचे नाव बंगालीत प्रकाशित झाल्याने नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

मराठी यादीत बंगाली भाषा आलीत कशी, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.()

शहरातील भिलपुरा, मरिमाता मंदिर परिसरातील भाग क्रमांक ११३ ची मतदारयादी निवडणूक विभागातर्फे प्रसिद्ध झाली आहे. माजी नगरसेवक किशोर चौधरी मतदार यादी पाहत असताना त्यांना या प्रभागातील मतदारसंघातील सर्व नावे मराठीत असताना एका मतदाराचे नाव चक्क बंगाली भाषेत आढळले.

मतदार यादीतील ८०५ क्रमांकाचे मतदाराचे, आईचे नाव, घर क्रमांक बंगाली भाषेत असून वय, लिंग मात्र मराठीत आहे. मात्र याच पानावरील इतर सर्व नावे व्यवस्थित मराठीतच प्रसिद्ध झाले असल्याचे सांगण्यात आले.

Voter's name printed in Bengali language in the electoral roll of the city.
Voter List : पुणे कँटोन्मेंट बोर्ड मतदार यादीत सुमारे 5 हजार ३६ नवीन नावे समाविष्ट

पाटील यांनी परिसरातील बंगाली कारगिराकडून हे नाव बंगालीच असल्याबाबत खात्री करून घेतली. त्यांनी या मतदार यादीची फोटो कॉपीही पाठविली आहे.

पाटील यांनी सर्व नावे मराठीत असताना एकच नाव बंगाली भाषेत कसे आले, याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले. याबाबत कोणतीही तक्रार नसून निवडणूक आयोगाने खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली.

Voter's name printed in Bengali language in the electoral roll of the city.
Voter List : मतदार याद्या बदलाचे षड्‍यंत्र; ठाकरे गटाचा आरोप, पदाधिकारी करणार पडताळणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com