Water Scarcity : नव्या पोलिस वसाहतीत पाणीटंचाई; उन्हाळ्यात पोहणाऱ्यांचा हिरमोड

Nashik Water scarcity
Nashik Water scarcityesakal

Water Scarcity : जिल्‍हा पोलिस दलात कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी सात मजली टोलेजंग इमारती उभ्या झाल्या आहेत. नव्यानेच बांधलेल्या या इमारतींमध्ये पोलिस कुटुंबीयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

परिणामी, पोलिस जलतरण तलावाचे पाणी या वसाहतींकडे वळविण्यात आल्याने तलाव बंद ठेवण्याची वेळ आली आहे. (Water shortage in new police colony jalgaon news)

जिल्‍हा पोलिस मुख्यालयामागे सात मजली अपार्टमेंट पोलिसांसाठी उभारले आहेत. या इमारतींमध्ये २५२ कुटुंब वास्तव्याला असून, संबंधित यंत्रणेने पिण्याच्या पाण्याची हव्या तशा प्रमाणात सोय न केल्याने या नवीन इमारतीत वास्तव्यास असलेल्या कर्मचारी कुटुंबीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वसाहतीत पाणीपुरवठा करणाऱ्या कूपनलिका आता कोरड्या पडू लागल्या असून, पोलिस जलतरण तलावाच्या कूपनलिकेचे पाणी या वसाहतींकडे वळविले आहे.

जलतरण तलाव कोरडे

पोलिस जलतरण तलावासाठी पूर्वीपासूनच राखीव कूपनलिका आहे. मात्र, नवीन पोलिस वसाहतीत पाणीटंचाई जाणवत असल्याने येथील लाईन पिकेट कर्मचाऱ्यांनी परस्पर जलतरण तलावाच्या कूपनलिकेचे पाणी वसाहतीत वळविल्याने जलतरण तलावाची पाणी पातळी प्रत्येक आठवड्यात तीन दिवस खालावलेली असते. यंदा पाईपच फुटल्याने दोन दिवस जलतरण तलाव बंद ठेवल्याने जलतरणपटू स्पर्धक, शाळकरी विद्यार्थ्यांचा पुरता हिरमोड झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Water scarcity
Health Tips : जंकफूड, सॉफ्ट ड्रिंकचे अतिसेवन करत असाल तर वेळीच सावध व्हा! नाहीतर...

पाण्यावरून वाद

कोरोनानंतर उन्हाळी सुट्यांमध्ये पहिल्यांदाच पोलिस जलतरण तलावात तुडुंब गर्दी उसळली असून, अतिरिक्त बॅचेसमध्ये तलाव पूर्ण क्षमतेने सुरू होता. मात्र, शनिवारी, रविवार आणि सोमवारी पाणी पातळीच नसल्याने हौशी जलतरणपटूंच्या पदरी निराशा येते.

परिणामी, पैसे भरून छंद पूर्ण होत नसल्याने पोहणाऱ्यांच्या तक्रारी वाढल्याने जलतरण तलाव नियंत्रकांनी संबंधित लाईन पिकेटला पाणी वळविण्यास नकार दिल्यावरून वाद झाल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांना ‘अमृत’ नाहीच

पोलिस दलातर्फे उभारण्यात आलेल्या सहा बिल्डींगमध्ये अद्यापही अमृत योजनेचा पाणीपुरवठा पोचला नसून त्याचा पाठपुरावाही कोणी करायला धजावत नाही. परिणामी, जुन्याच पद्धतीने या वसाहतीला पाणीपुरवठा होत असून, भविष्यात तीव्र पाणीटंचाईची शक्यता नाकारता येत नाही.

Nashik Water scarcity
Dhule news : वाल्हवे येथे आढळला दुर्मिळ पोवळा साप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com