Latest Marathi News | पाणी आकाशातून टाकणार काय ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gulabrao patil Statement About Water Supply

Water Supply Minister Gulabrao Patil Statement : पाणी आकाशातून टाकणार काय ?

जळगाव : पाऊस अधिक झाल्यामुळे नद्यांना पाणी आले आहे, पाणीपुरवठा करणारे पंप गाळात रुतले आहेत, त्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकत नाही, ही स्थिती असताना नळांना पाणी आकाशातून टाकतील काय, असा सवाल पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

पाणीपुरवठामंत्री पाटील यांच्या धरणगाव मतदारसंघात पाण्याची टंचाई आहे. त्यावर ठाकरे गटाच्या शिवसेनेने आंदोलन केले व पाणीपुरवठामंत्र्यांच्या गावातच पाणीटंचाई, असा आरोप केला. याबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता, गुलाबराव पाटील म्हणाले, की नद्यांना पूर आल्याने पाण्याचे पंप नदीत आहेत, त्यात गाळ साचल्याने हे पंप बंद आहेत.(Water Supply minister Gulabrao patil statement he ask question to public in that statement Jalgaon News)

हेही वाचा: Guardian Minister Gulabrao Patil : 79.98 दलघमी आकस्मिक पाणी आरक्षणास बैठकीत मान्यता

पंप बंद असल्याने एकट्या धरणगाव नव्हे, तर एरंडोल, जळगाव येथेही दूषित पाणीपुरवठा होत आहे. हे पंप दुरुस्त करण्यासाठी पाणबुडीसुद्धा पाण्यात जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे.

त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे, आता नदीत पंपसेट आहे, नदीत विहीर आहे, नदीला पाणी आहे अशा स्थितीत पाणी काय आकाशातून टाकले जाईल का, याचा विचार करावा. तांत्रिक बिघाडामुळे पाणीटंचाई निश्चित आहे, मात्र त्याचे भांडवल कोणी करू नये.

हेही वाचा: Crime Update : माथेफिरूंनी लावली Parkingमधील वाहनांना आग