
WhatsApp malware attack Jalgaon businessman loses nearly five lakh rupees
Esakal
व्हॉटसअप हे सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया मेसेजिंग अॅप असून आता सायबर क्रिमिनल्स या माध्यमातून फसवणूक करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवताना दिसतात. व्हॉटसअपवर लिंक पाठवून मोबाईल हॅक करायचा आणि बँकिंग डेटा चोरून खात्यावरचे पैसे काढून घेतल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. आता व्हॉटसअपमधील ऑटो डाऊनलोड सेटिंगमुळे एका व्यापाऱ्याला पावणे पाच लाख रुपयांचा फटका बसलाय. मोबाईलवर आपोआप एपीके फाइल डाऊनलोड झाली आणि त्यानंतर व्यापाऱ्याच्या खात्यातून ४ लाख ६४ हजार रुपये काढले गेले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.