भाषण सुरु असतानाच एकनाथ खडसेंच्या हातातून खेचला माईक; सभास्थळी कार्यकर्त्यांचा गोंधळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या हातातून भर व्यासपीठावरुन माईक खेचल्याचा प्रकार समोर आलाय.
Eknath Khadse
Eknath Khadseesakal
Summary

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या हातातून भर व्यासपीठावरुन माईक खेचल्याचा प्रकार समोर आलाय.

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या हातातून भर व्यासपीठावरुन माईक खेचल्याचा प्रकार समोर आलाय, त्यामुळं काहीकाळ सभेत गोंधळ उडाला होता.

या प्रकारामुळं व्यासपीठावर असलेले नेतेमंडळी आणि पदाधिकारी आवाक् झाल्याचं पहायला मिळालं. मात्र, संबंधित व्यक्तीला पदाधिकाऱ्यांनी लागलीच बाजूला करत खडसेंच्या हातात माईक परत केला. संबंधित व्यक्ती हा राष्ट्रवादी पक्षाचाच कार्यकर्ता आहे, अशी माहिती समोर आलीय. या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

Eknath Khadse
Congress : भारत जोडो यात्रेत 19 नोव्हेंबरला राहुल गांधींसोबत दिसणार फक्त महिला; जाणून घ्या कारण

जामनेर इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हिजेएनटी मेळाव्यात हा प्रकार घडला असून ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. यावेळी आपल्या भाषणात खडसे म्हणाले, जसजशी संध्याकाळ होते तसतशी घरी जायची घाई होते. एका बाजूला घरी जायचं असतं तर दुसऱ्या बाजूला तिकडं जायचं असतं. हम तो बंजारा है. हमने तो अभीतक नहीं छोडी, असं त्यांनी सांगताच कार्यकर्त्यांत चांगलाच हशा पिकाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com