दिवसाला 20 सिगारेट ओढणारा शाहिद कसा बनला निर्व्यसनी?

शाहिद कपूरनं नुकत्याच एका मुलाखतीत दारु,सिगारेटचं व्यसन सुटण्यामागचं मुख्य कारण सांगितलं आहे.
Shahid kapoor
Shahid kapoorGoogle
Updated on

शाहिद कपूरनं(Shahid Kapoor) नुकतचं एका मुलाखतीत सांगितलं की कबीर सिंग(Kabir Singh)नंतर त्यानं चक्क धुम्रपान करणं सोडलं. कबीर सिंग सिनेमात शाहिद कपूरनं एका सर्जनची(डॉक्टरची) भूमिका केली आहे. हा सिनेमा २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. २०१७ मध्ये आलेल्या अर्जुन रेड्डी या तेलुगु सिनेमाचा हा रीमेक होता. सिनेमात कबीर सिंगची प्रेयसी दुसऱ्या कोणाशीतरी लग्न करते त्यानंतर आधीच भयानक राग डोक्यात घेऊन वावरणारा आणि रागावर कंट्रोल नसणारा कबीर दारु,ड्रग्ज अशा सगळ्या व्यसनांच्या आहारी जात,चैन स्मोकरही बनतो.

Shahid kapoor
ठरलं! केएल राहुल अथिया शेट्टीसोबत घेणार सात फेरे; कधी,कसा रंगणार सोहळा?

शाहिदनं नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं आहे की ,''कबीर सिंग सिनेमात चैन स्मोकरची भूमिका साकारताना मी माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात धुम्रपान करणं सोडून दिलं. दारु आणि सिगारेट ही व्यसनं सोडून आपण आता फिटनेसला कसं महत्तव देतो'' याविषयीही शाहिद व्यक्त झाला आहे. वयाच्या ४१ व्या वर्षीही आपण इतकं फिट दिसण्यामागे आपलं व्हेजिटेरियन डाएट असल्याचं शाहिद म्हणाला आहे. शाहिद पुढे म्हणाला आहे,''माझ्यात काही बदल नक्कीच झाले,जे मनापासून मी केले. तुमच्या मनतील भावनाच तुम्हाला प्रत्येक गोष्ट करायला तयार करत असतात. जसं,सध्या मी माझ्या मुलांकडे खूप जास्त बारकाईनं लक्ष देतो. कारण मला जगण्याची उर्जा त्यांच्यापासूनच मिळते. त्यांच्यासोबत राहणं,वावरणं,त्यांच्याविषयी विचार करणं हे सारं मी एन्जॉय करतो. मी माझं बालपण त्यांच्यात शोधतो''.

Shahid kapoor
लग्नानंतर 'मिसेस बच्चन' हाक ऐकून घाबरलेली ऐश्वर्या राय; काय होतं कारण?

आपल्या लाइफस्टाइलविषयी बोलताना शाहिद मुलाखतीत म्हणाला,''मी रोजच्या आयुष्यातही काही सवयी,नियम स्वतःला लावून घेतलेयत,जे मी काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करीत असतो. मी वेळेत झोपतो,खासकरुन मला मुलं झाल्यानंतर माझ्यात खूप चांगले बदल झाले आहेत. मला दारु,सिगारेटचं व्यसन नाही. मी धुम्रपान करायचो पण कबीर सिंगनं माझ्या आयुष्यात जादू घडवून आणली. मी आधी दिवसाला २० सिगारेट प्यायलो आहे,अर्थात कबीर सिंगच्या शूटिंगसाठी,पण २०१९ पासून आजतागायत सिगारेट प्यायलो नाही''.

Shahid kapoor
'स्त्री' जन्माविषयी पाकिस्तानी अभिनेत्रीनं केलं धक्कादायक वक्तव्य

शाहिद कपूरचा 'जर्सी' सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येत आहे. या स्पोर्ट्स ड्रामात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि त्याचे वडील अभिनेते पंकज कपूरही महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. हा सिनेमा २२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com