Cyber Crime : ऑटो डिलरच्या खात्यातून साडेतीन लाख लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cyber crime

Cyber Crime : ऑटो डिलरच्या खात्यातून साडेतीन लाख लंपास

जळगाव : मोबाईलवर लिंक पाठवून प्ले-स्टोअरमधून आयएसएल ॲप डाउनलोड करायला सांगून सायबर ठगाने ऑटो डिलरशीपचे काम करणाऱ्या प्रौढाला साडेतीन लाखांचा ऑनलाइन गंडा घातला. (cyber fraud 3.5 Lakh online scam to adult on online product buying jalgaon news)

मेहरूणच्या नशेमन कॉलनीतील रिझवान अली लियाकत अली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी ई-कार्ड लॉजिस्टिक कंपनीकडून ऑनलाइन शेविंग प्रॉडक्ट मागविले होते. प्रॉडक्ट खराब मिळाल्यामुळे रविवारी (ता. २२) दुपारी चारला त्यांनी कंपनीच्या कस्टमर केअरला संपर्क साधला.

त्यावेळी त्यांना कंपनीकडून फोन येईल, तेव्हा तक्रार करा, असे सांगण्यात आले. काही वेळेनंतर रिझवान अली यांना मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. संबंधित व्यक्तीने रिझवान यांना लिंक पाठवून प्ले-स्टोअरमधून आयएसएल ॲप डाउनलोड करायला सांगितले.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Graduate Constituency Election : शनिवार ते सोमवार 3 दिवस मद्यविक्रीवर बंदी

नंतर तीन तासांनंतर रिझवान यांच्या खात्यातून ५० हजार रुपयांचे सात ट्रान्झॅक्शन झाल्याचा एसएमएस त्यांना मिळाला. सोमवारी रिझवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात साडेतीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: Online Job Fair : 30, 31 जानेवारीला ऑनलाइन रोजगार मेळावा