1 चापट अन् 3 महिन्यांचा कारावास; महिला पोलिसावर हात उगारणे पडले महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Woman Arrest

1 चापट अन् 3 महिन्यांचा कारावास; महिला पोलिसावर हात उगारणे पडले महागात

जळगाव : कर्तव्यावर हजर असतांना महिला पोलिस कर्मचाऱ्याने वाहन चालक महिलेस परवाना मागीतल्याने वादाला सुरवात झाली. दंड न भरता वाद वाढत गेला अन् वाहन चालक महिलेने पोलिस कर्मचारी महिलेच्या कानशिलात लगावली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होवुन न्यायालयात खटला चालला. त्याचा निकाल आला असता संशयीत महिलेस 3 महिने साध्याकैदेसह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. (Woman jailed for 3 months for assaulting female police officer in jalgaon)

असा झाला वाद...

शहर वाहतुक विभागात कार्यरत महिला पोलिस कर्मचारी कविता सातपुते या (13 एप्रिल 2016) रोजी शहरातील बेंडाळे चौकात ड्युटीवर होत्या. यावेळी रेखा डिगंबर जाधव या त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या मोपेड वाहनाने जात असतांना पोलिस कर्मचारी सातपुते यांनी त्यांना थांबवुन कागदपत्रांसह वाहन परवान्याची मागणी केली. मला वाहन परवाना मागते यावरुन वादाला सुरवात झाली. वाद वाढत जावुन रेखा जाधव या महिलेने महिला पोलिस कर्मचारी कविता विसपुते यांच्या कानशिलात लगावली. शिविगाळ, धक्का बुक्की, आरडाओरड करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून रेखा जाधव हिच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला (भा.द.वि चे कलम-353, 332, 323, ,504 506) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. न्या.व्ही.बी. बोहरा यांच्या न्यायालयात सरकारपक्षातर्फे ॲड. अनुराधा वाणी यांनी एकुण 5 महत्वपुर्ण साक्षीदारांच्या साक्ष नोंदवुन घेतल्या. साक्षी पुराव्याच्या आधारे रेखा जाधव यांच्यावर दोषारोप निश्चीत होवुन त्यांना न्यायालयाने (कलम-323 अन्वये 3 महिने साधी कैद 500 रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस कारावास, 504 अन्वये 3 महिने कारावास 200 रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस कारावास, कलम-504 व 406 अन्वये प्रत्येकी 3 महिने साधी कैद कलम-188 चे कलम-130 चे उल्लंघन केल्याने शंभर रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

हेही वाचा: जळगाव : 3 लाखांसाठी विवाहितेचा छळ

संशयीतही महिला अन्‌...

महिला पोलिस कर्मचारी कविता विसपुते यांच्या तक्रारीवरुन दाखल खटल्यातील संशयीत महिला रेखा जाधव, खटल्याचे कामकाज महिला सरकारी अभियोक्ता ॲड. अनुराधा वाणी यांनी चालवले. खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन जरीना तडवी यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; एकाला अटक

Web Title: Woman Jailed For 3 Months For Assaulting Female Police Officer In Jalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonpoliceArrested
go to top