
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; एकाला अटक
यावल (जि. जळगाव) : तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संबंधित संशयित तरुणासह त्यास मदत करणाऱ्या अन्य तीन जणांवर येथील पोलिसात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण त्याच गावातील संशयित चंद्रकांत उर्फ भूषण आत्माराम सोनवणे ( कोळी) याने 27 एप्रिलला केले. चंद्रकांतने महेंद्र कोळी (रा. आसोदा, ता. जळगाव) याच्या मदतीने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. संशयित चंद्रकांत त्या अल्पवयीन मुलीस नाशिक येथील नातेवाईक जितेंद्र कोळी व दीपाली जितेंद्र कोळी यांच्या घरी घेऊन गेला. त्या ठिकाणी सलग चार दिवस मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही अल्पवयीन मुलगी रविवारी (ता.1) घरी परतल्यावर तिने घडलेली घटना कुटुंबीयांना सांगितली. यापूर्वीच येथील पोलिस ठाण्यात संबंधित मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. संशयित चंद्रकांत उर्फ भूषण सोनवणे (कोळी) यास ताब्यात घेण्यात आले. त्यास पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात इतर तीन संशयितांचा समावेश करण्यात येऊन त्यांचे शोधार्थ पोलिस पथक रवाना झाले आहेत. पोलिस निरीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, सहाय्यक फौजदार अजिज शेख, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहेत.
हेही वाचा: जळगाव : 3 लाखांसाठी विवाहितेचा छळ
हेही वाचा: जळगाव : 'नाचताना धक्का' लागल्या कारणातून तरुणाचा खून
Web Title: Sexual Abuse By Abducting A Minor Girl Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..