
Jalgaon : बाललैंगिक अत्याचार प्रकरणी संशयित महिलेस अखेर अटक
जळगाव : बालिकेवर लैंगिक अत्याचार (Child Sexual Abuse) करणाऱ्या गुन्ह्यातील सात महिन्यांपासून फरार संशयित महिलेस पोलिसांनी कांचननगर, जैनाबाद परिसरातून अटक केली आहे. सपना सागर पाटील असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला होता. (Woman suspected in child sexual abuse case finally arrested Jalgaon Crime News)
हेही वाचा: नाशिक : कष्टकरी आई–बापांची लेकरं झाली बारावी उत्तीर्ण
बाललैंगिक अत्याचार प्रकरणी संशयित महिला सपना पाटील हिच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात १० डिसेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार होती. पथकातील उपनिरीक्षक दीपक जगदाडे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, दत्तात्रय बडगुजर, विकास सातदिवे, गणेश शीरसाळे, योगेश बारी, छगन तायडे अशांच्या पथकाने बातमीची खात्रीकरुन अलगदपणे धडक देत जैनाबादेतून संशयित सपना पाटील हिला ताब्यात घेतले आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे
हेही वाचा: भद्रकाली पोलिसांकडून 2 हजाराचा मद्यसाठा जप्त
Web Title: Woman Suspected In Child Sexual Abuse Case Finally Arrested Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..