Latest Marathi News | महिलेच्या मृत्यूप्रकरणी तरुणास 6 वर्षे कैद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Young man Accused  Areest for 6 years

Jalgaon Crime News : महिलेच्या मृत्यूप्रकरणी तरुणास 6 वर्षे कैद

जळगाव : लाठ्यांनी मारहाण करत महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एरंडोल तालुक्यातील खडके खुर्द येथील तरुणास जिल्हा न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरविले आहे. या प्रकरणी त्यास सहा वर्षे कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

एरंडोल तालुक्यातील खडके खुर्द येथे छायाबाई किशोर महानुभाव, पती किशोर शेनफडू महानुभाव, मुलगी पूजा व सरला ऊर्फ गुड्डी तुकाराम धनगर असे चौघे १५ मे २०१६ ला बैलगाडीने शेतात जात असताना सरलाचा भाऊ समाधान, आई सुबाबाई व वडील तुकाराम त्र्यंबक धनगर अशा या चौघांजवळ आले व सरलाला तुम्ही कामाला घेऊन जातात, असा जाब विचारून व शिवीगाळ करून समाधानने हातातील काठीने छायाबाईच्या डोक्यावर मारले.

तसेच सरलाला कामावर नेले तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली होती. छायाबाई यांनी उपचार घेत असताना पोलिसांना असा जबाब दिला होता. त्यावरून एरंडोल पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.(women death case accused young man under jail 6 years jalgaon crime news)

हेही वाचा: Cyber Crime Case : आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाऊंट हॅक !

यानंतर १८ मेस छायाबाईचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता.

तपासाधिकारी एम. एस. बैसाणे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले, तर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहन देशपांडे यांच्या न्यायालयात हा खटला चालला.

चौदा जणांच्या साक्षी

ठरल्या महत्त्वाच्या

मृताची मुलगी पूजा, डॉ. शेख आसिफ इकबाल, डॉ. प्राजक्ता भिरूड, डॉ. मुकेश चौधरी, मृत्युपूर्व जबाब घेणारे सहाय्यक फौजदार भालचंद्र पाटील आदींसह १४ जणांच्या साक्षी घेण्यात आल्या. यात समाधान धनगर याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी धरून सहा वर्षे कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गुन्ह्यातील दुसरा आरोपी तुकाराम धनगर याचा खटला सुरू असताना मृत्यू झाला असून, सुबाबाईची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

हेही वाचा: Motivational Story : गतिमंदांसाठी ‘ती’ ठरलीय ‘मदर तेरेसा’

टॅग्स :Jalgaoncrimedeathwomen