Bahinabai Mohotsav : मराठी संस्कृती जपणारा फॅशन शो रंगला

भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित बहिणाबाई महोत्सवात शनिवारी (ता.२७) सायंकाळी मराठी संस्कृती जपणारा महिलांचा फॅशन शो पार पडला.
Successful women in various fields were felicitated in Bahinabai Mahotsav on Saturday
Successful women in various fields were felicitated in Bahinabai Mahotsav on Saturdayesakal

जळगाव : भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित बहिणाबाई महोत्सवात शनिवारी (ता.२७) सायंकाळी मराठी संस्कृती जपणारा महिलांचा फॅशन शो पार पडला. यात मराठमोळ्या पोशाखात तरुणींनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

सागर पार्क मैदानावरील पाच दिवसीय बहिणाबाई महोत्सवात तिसऱ्या दिवशी जळगावकरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. (womens fashion show preserving Marathi culture was held at Bahinabai festival jalgaon news)

शनिवारची सुट्टी असल्याने अनेकांनी सायंकाळी सागर पार्क मैदानावर येत बचत गटांच्या स्टॉलला भेटी दिल्या. महोत्सवात साज मेकअप स्टुडिओ यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आलेल्या मराठी संस्कृतीच्या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये मुंबई, सुरत, पुणे जळगाव येथील २३ मॉडेल्सनी सहभाग घेतला. या शोमध्ये हळदी,लेंगा, मारवडी, गुजराथी, मराठी या प्रकारात पेहराव सादर केले. विनामूल्य असलेल्या या शोमध्ये सहभागी स्पर्धक व विजेत्यांना क्राऊन व पारितोषिकांनी गौरविण्यात आले.

आकर्षक पेहराव असलेल्या मॉडेल्सनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यासाठी अर्चना जाधव यांनी सहकार्य केले.

Successful women in various fields were felicitated in Bahinabai Mahotsav on Saturday
Fashion Show : टाळ्यांच्या कडकडाटात जेव्हा त्या दिव्यांग तरूणी रॅम्पवर अवतरल्या...

यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, सुक्ष्म व लघू उद्योग संचालनालयाचे सहायक संचालक प्रफुल्ल उमरे, माजी महापौर सिंधू कोल्हे, सिद्धार्थ बाफना.

सरीता माळी, पियुष कोल्हे, विनोद ढगे, सचिन महाजन, सागर पगारिया, विक्रांत चौधरी, अक्षय सोनवणे, हितेश चौधरी, मंगेश पाटील, आदी उपस्थित होते.

यांचा केला गौरव

रविवारी शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानासाठी डॉ. प्रीती अग्रवाल, महिला सक्षमीकरणासाठी अर्चना जाधव, मनिषा घोलप यांना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

Successful women in various fields were felicitated in Bahinabai Mahotsav on Saturday
Jalgaon News : प्रमुख सूत्रधारास अटक करण्याची मागणी; एरंडोल दगडफेक प्रकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com