Jalgaon News : शॉक बसल्याने कामगाराचा मृत्यू; कामावरील पहिलाच दिवस ठरला अखेरचा

Worker dies due to shock jalgaon news
Worker dies due to shock jalgaon newsesakal

Jalgaon News : औद्योगीक वसाहतीत एका प्लास्टिक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी विद्युत शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे या तरुणाचा कामावरील पहिलाच दिवस अखेरचा दिवस ठरला.

राहुल दरबार राठोड (वय-२२ रा. शेलगाव ता.बऱ्हाणपूर मध्यप्रदेश ह.मु. फातिमा नगर, जळगाव) असे मयत कामगार तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या अचानक मृत्यू बातमी कळताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. (Worker dies due to shock jalgaon news)

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेत कंपनीतील जीवन गजानन चौधरी (रा. बेदावद ता. जामनेर) हा कर्मचारी देखील जखमी झाला.

मृत राहुल हा कामानिमित्त २० वर्षांपासून आईवडील व लहान भाऊ यांच्यासोबत मुळगाव सोडून जळगाव येथे स्थलांतरित झाले होते. एमआयडीसीच्या मागील फातिमा नगरात तो, भाड्याच्या खोलीत वास्तव्याला होता.

Worker dies due to shock jalgaon news
Thalassemia Disease : ‘रेडक्रॉस’कडून 23 हजार 'थॅलसेमिया' ग्रस्तांना जीवनदान! लाखो रक्त पिश्‍व्यांचे संकलन

राहुल हा मिळेल त्या कंपनीत काम करीत कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. एमआयडीसीतील आदित्य इंडस्ट्रीज (एस २८) या प्लास्टिक कंपनीत राहुल सोमवारी (ता.१६) सकाळी आठला कंपनीत हजर झाला.

नवीन कंपनीत पहिल्याच दिवशी प्लास्टिक मोल्डिंग मशिनवर काम करीत असताना वीजेचा जोरात धक्का बसला. यात राहुल आणि जीवन गंभीर जखमी झाले. दोघांना इतर कामगारांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी राहुलला तपासून मृत घोषित केले.

Worker dies due to shock jalgaon news
Jalgaon News : गोंभी येथील ‘ती’ फेरफार नोंद नामंजूर; भुसावळ नायब तहसीलदारांचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com