World Poetry Day : जागतिक कवितादिनी रंगली काव्यसंध्या, उभारली ग्रंथगुढी

World Poetry Day poetry evening was organized jalgaon news
World Poetry Day poetry evening was organized jalgaon newsesakal

भुसावळ (जि. जळगाव) : येथील डी. एस. हायस्कूलशेजारील सार्वजनिक वाचनालयात जागतिक कवितादिनाचे औचित्य साधून निमंत्रित कवींची काव्यसंध्या रंगली.

सोबतच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येचे निमित्त साधून विविध प्रकारच्या ग्रंथांची गुढी उभारण्यात येऊन ग्रंथगुढीचे पूजन करण्यात आले. (World Poetry Day poetry evening was organized jalgaon news)

कवी डॉ. मिलिंद धांडे अध्यक्षस्थानी होते. साहित्यिक तथा प्रकाशक काशिनाथ भारंबे, ज्येष्ठ कवयित्री ललिता टोके, बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, कवयित्री जयश्री काळवीट, शिक्षक कवी गणेश जावळे, शिक्षक कवयित्री संध्या भोळे, सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल नितीन तोडकर, सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे, संचालक हरीश पाटील, सेवक होनाजी चौधरी, मोबीन पटेल यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविकात जयश्री काळवीट यांनी कार्यक्रम आयोजनाचा हेतू सांगून कवितादिनाचे महत्त्व विशद केले. साहित्यिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल काशिनाथ भारंबे यांना मध्य प्रदेशात झालेल्या समारंभात सारस्वत सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने ग्रंथपाल नितीन तोडकर व कवयित्री जयश्री काळवीट यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

World Poetry Day poetry evening was organized jalgaon news
Sparrow Count Activity : राज्यात 31 जिल्ह्यांतून 8 हजार चिमण्यांची नोंद!

त्यानंतर उपस्थित कवींनी आपापली स्वरचित कविता सादर केली. अध्यक्षीय मनोगतात डॉ. मिलिंद धांडे यांनी आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असलेले कवितेचे महत्त्व सांगितले. कवयित्री संध्या भोळे यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे यांनी आभार मानले.

World Poetry Day poetry evening was organized jalgaon news
Jalgoan News : वृद्धेस पाठविले खासगीत; ‘जीएमसी’ उरले नावा पुरतेच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com