एकाच वेळी १०० उपग्रह अवकाशात सोडण्याचा जागतिक विक्रम; भुसावळच्या विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग ​

चेतन चौधरी 
Thursday, 11 February 2021

काही झाडांचे बीजही अंतराळात पाठवण्यात आली यामुळे अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत होईल.

भुसावळ  : इतिहासात पहिल्यांदाच जागतिक विक्रमासाठी शहरातील 11 बालवैज्ञानिकांची निवड व्हावी. ही शहरासाठी गौरवाची बाब मानली जात आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड, अशिया बुक रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करणार्‍या या महत्त्वकांक्षी मोहिमेत जागतिक विक्रमासाठी येथील टीम ने मोठे योगदान दिले.

आवश्य वाचा- भाजपचा उद्देश खोटा ठरला ! ज्यांनी भूमिपूजन केले त्यांच्याच हस्ते जलपूजन करू 
 

डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड क्युब्ज चॅलेंज 2021चा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउण्डेशन स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुपतर्फे राबवलेल्या प्रकल्पांमध्ये देशातील एक हजार विद्यार्थ्यांच्या हस्ते 100 उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्यात आले. या उपक्रमात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी 39 उपग्रह बनवून हा जागतिक विक्रम नोंदवला आहे. हे प्रक्षेपण रामेश्वरम येथून करण्यात आले.

भुसावळच्या विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग

जगातील सर्वात कमी वजनाचे म्हणजे 25 ग्रॅम ते 80 ग्रॅम वजनाचे हे उपग्रह भारतातील विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या बनवून प्रक्षेपित केल्याने हे सर्व विक्रम प्रस्थापित झालेले आहे. राज्यातून 65 विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रत्यक्ष हजर राहून हा विश्वविक्रमात सहभाग नोंदविला आहे. येथील नाहाटा महाविद्यालयातील शिवम शैलेंद्रकुमार भंगाळे, वैभव नामदेव रत्नपारखी, सागर सचिन सरोदे, खुशाल शरद पाटील तसेच के. नारखेडे विद्यालयातील समीक्षा नितीन पाटील, पोदार इंटरनॅशनल स्कूलचा अर्णव नितीन पाटील, प्रणव दीपक महाजन, याबरोबर सोहम राजेश वाणी, नेत्रज प्रशांत चौधरी, सुमित गजानन निवे, जिया जावेद तडवी या 11 बालवैज्ञानिक विद्यार्थ्यांची टिम होती. येथील डॉ. भाग्यश्री शैलेंद्रकुमार भंगाळे (पु. ओ. नाहाटा महाविद्यालय) व नितीन पाटील (के नारखेडे विद्यालय) हे मार्गदर्शक होते. देशाच्या एक हजार विद्यार्थ्यांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येने मोहीमेत नेतृत्व केले ह्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आवर्जून वाचा- जिल्‍ह्‍याला जलसंपदा मंत्री लाभल्‍यानंतरही प्रकल्‍प राहिले अपुर्ण; खडसेंचा महाजनांवर निशाणा

असे होते उपग्रह
हे उपग्रह जगातील सर्वात कमी 25 ते 80 ग्रॅम वजनाचे 100 उपग्रह बनवून त्यांना 35 ते 38 हजार मीटर उंचीवर हाय अलटीट्युड सायंटिफिक बलूनद्वारे स्थापित केले गेले. ह्या उपग्र्रहाची बांधणी कंपोझिट मटेरियलमध्ये केलेली होती. यामध्ये सेन्सर्स, जीपीएस ट्रेकिंग, लाइव्ह कॅमेरा जोडलेले होते. तेथून प्रत्यक्ष ओझोन, कॉस्मिक किरण, अल्ट्राव्हायोलेट किरण, सूर्याची तीव्रता, नाइट्रेट हवेचा वेग, बलून उपग्रहाचा वेग, गायरो मीटर, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड तसेच हवेची शुद्धता, ग्लास, फायबर, कार्बन फायबर इत्यादी सेन्सरचा उपयोग केलेला होता. काही झाडांचे बीजही अंतराळात पाठवण्यात आली यामुळे अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत होईल. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world record marathi news bhusawal students teachers involves world record launching hundred satellites