Jalgaon News | तृणधान्याचा आहारात वापर करा : योग तज्ज्ञ सीमा पाटील

Jalgaon: Collector Aman Mittal, Dr. Pankaj Asia, Commissioner Devidas Pawar, Sambhaji Thakur, Anil Bhokare etc.
Jalgaon: Collector Aman Mittal, Dr. Pankaj Asia, Commissioner Devidas Pawar, Sambhaji Thakur, Anil Bhokare etc.esakal
Updated on

जळगाव : योगाबरोबरच तृणधान्याचा आहार घ्यावा. योगक्रिया आणि आहारात तृणधान्याची सांगड घातल्यास निरोगी आयुष्य अतिशय कमी खर्चात सर्वसामान्य जनतेला उपभोगता येईल. तृणधान्याची महत्त्वाची जाणीव करून दिल्यास कुटुंबाच्या आहारात तृणधान्याचा समावेश आपोआप होईल.

आज ५० टक्क्यांपेक्षा मधुमेह, बद्धकोष्टता, हृदयरोग यांची रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल, असा विश्‍वास आंतरराष्ट्रीय योग तज्ज्ञ सीमा पाटील यांनी येथे व्यक्त केला. (Yoga expert Seema Patil say Use cereal in your diet jalgaon news)

Jalgaon: Collector Aman Mittal, Dr. Pankaj Asia, Commissioner Devidas Pawar, Sambhaji Thakur, Anil Bhokare etc.
Jalgaon News : 13 वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

२०२३ आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षे साजरे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. २८) बैठक झाली. जिल्हाधिकारी अमन मित्तल अध्यक्षस्थानी होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, आयुक्त देविदास पवार, विषय विशेषज्ञ अतुल पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे, आहार तज्ज्ञ डॉ. अनंत पाटील आदी उपस्थित होते.

श्री. भोकरे यांनी प्रास्ताविकात आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षे साजरे करताना विविध विभागांचा असलेला सहभागाबाबत अवगत केले.तृणधान्यपासून बनवित असलेल्या उपपदार्थाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. आहार तज्ञ डॉ. पाटील यांनी आहारातील तृणधान्याचे महत्त्व समजवून सांगितले.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Jalgaon: Collector Aman Mittal, Dr. Pankaj Asia, Commissioner Devidas Pawar, Sambhaji Thakur, Anil Bhokare etc.
Jalgaon News : 400 वर जोडप्यांच्या ‘मनोमिलना’ त महिला कक्षास यश

वसतिगृहातील आहारात तृणधान्याचा सामावेश

जिल्हाधिकारी मित्तल यांनी धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने शासकीय वसतिगृहामध्ये तृणधान्यापासून बनविलेल्या पदार्थांच्या आहारात समाविष्ट करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. तृणधान्याच्या उपपदार्थांबाबत जनजागृती करावी.

जिल्हा प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी निबंध, वकृत्व स्पर्धा, तसेच पोष्टीक तृणधान्यापासून पदार्थ बनवून आणून शाळेतील आनंदामेळा उपक्रमात याचा समाविष्ट करावा. विविध शासकीय विभागाच्या कार्यक्रम व आढावा बैठकीत अल्पोहार व भोजनात तृणधान्य पदार्थांचा समावेश करण्यात यावा. शालेय पोषण आहार व शिवभोजन थाळीत तृणधान्य उपपदार्थाचा समावेश करावा. तृणधान्याच्या सेवनामुळे फायदा झालेल्या विविध रुग्ण यांच्या यशोगाथा बनवा.

Jalgaon: Collector Aman Mittal, Dr. Pankaj Asia, Commissioner Devidas Pawar, Sambhaji Thakur, Anil Bhokare etc.
Nashik Crime News : धोकादायकरीत्या गॅससिलिंडरची हाताळणी करणाऱ्या ‘त्या’ रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com