
Maharashtra Mini Olympics : योगस्पर्धा 3 जानेवारीपासून अन् सायकलिंगच्या स्पर्धा 5 ला!
नाशिक : महाराष्ट्र मिनी ऑलिंपिक स्पर्धांतर्गत नाशिक जिल्ह्यात दोन क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा होणार आहेत. योगाची स्पर्धा ३ जानेवारीपासून तर सायकलिंग स्पर्धा ५ जानेवारीला पार पडणार आहे. या स्पर्धेनिमित्त क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन केले आहे.
ही रॅली शुक्रवारी (ता.३०) पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथून निघणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा विभागीय क्रीडा ज्योत रॅली आयोजन समितीचे अध्यक्ष गंगाथरन डी. यांनी बुधवारी (ता.२८) पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी म्हणाले, की रॅली व स्पर्धेचे संपूर्ण नियोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत झालेले असून, रॅलीमध्ये नाशिकमधील खेळाडूंचा सहभाग असणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेनिमित्त राज्यभरातील खेळाडू नाशिकला येत आहेत. प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे म्हणाले, की योग स्पर्धेसाठी २ जानेवारीला राज्यभरातील खेळाडू दाखल होतील.
विभागीय क्रीडा संकुलात ३ व ४ जानेवारीला ही स्पर्धा पार पडेल. ५ जानेवारीला पारितोषिक वितरण समारंभ होईल. सायकलिंग स्पर्धा शिर्डी ते सिन्नर यादरम्यानच्या समृद्धी महामार्गावर होणार आहे. टाईम ट्रायल प्रकारात पुरुष गटाची ४० किलोमीटर, महिला गटाची ३० किलोमीटर तर मासस्टार्ट प्रकारात पुरुषांसाठी ६० किलोमीटर व महिला गटासाठी ४० किलोमीटर अंतराची सायकलची शर्यत होईल.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
हेही वाचा: Nashik News : सातपूरमध्ये घराला लागली आग अन् संसारपयोगी वस्तु जळून खाक!
विविध ठिकाणी ज्योतीचे स्वागत
राज्यातील प्रत्येक विभागीय क्षेत्राच्या स्तरावर क्रीडा ज्योत काढली जाते आहे. त्यानुसार नाशिक विभागाची क्रीडा ज्योत उद्या (ता.२९) जिल्ह्यात दाखल होणार आहे. चांदवड, मालेगाव, पिंपळगाव बसवंत या ठिकाणी रॅलीचे स्वागत केले जाईल.
शुक्रवारी (ता.३०) सकाळी सातला नाशिक शहरात क्रीडा ज्योत रॅलीच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. विभागीय क्रीडा संकुल येथून रॅलीला सुरवात करत, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर समारोप केला जाईल. व यानंतर ज्योत पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहे.
हेही वाचा: Nashik News: मध्यरात्री 3 वाहनांचा विचित्र अपघात; अपघातग्रस्त गाडीत कोट्यावधी रुपयांच्या नोटांची अफवा?