Jalgaon News : विहिरीत पोहण्याचा मोह आला अंगलट; तरुणाचा मृत्यू

drowning death
drowning deathesakal

Jalgaon News : विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या सुभाषवाडी (ता. जळगाव) येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. ३०) सकाळी आठला घडली. पवन भिका जाधव (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. (young man died due to drowning jalgaon news)

पवन हा मिस्त्री काम करून उदरनिर्वाह करीत होता. शनिवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडला व गावातील एका विहिरीजवळ आला. तेथे त्याला पोहण्याचा मोह झाल्याने तो, विहिरीत उतरला.

मात्र, पोहताना तळाशी जावून बुडाला. याबाबत ग्रामस्थांना कळताच त्यांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलावले.

drowning death
Jalgaon Crime: धमकी दिल्याने युवकाची आत्महत्या; 2 महिलांसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

त्यांनी मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पवनच्या मागे आई-वडील, २ भाऊ, २ विवाहित बहीणी असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

drowning death
Jalgaon News : पत्नीच्या विरहात पतीने कवटाळले मृत्यूला; अपघातात जखमी पत्नीचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com