Jalgaon Crime News : दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाचा कापला कान

Crime News
Crime Newsesakal
Updated on

जळगाव : शहरातील तांबापुरा भागातील बिलाल चौकात उभा असलेल्या तरुणाचा धारदार ब्लेडने कान कापला होता. या गुन्ह्यातील संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी चक्क तीन महिन्यांनंतर अटक केली.

तांबापुरा येथील रहिवासी व भंगार व्यावसायिक अरबाज रऊफ खाटिक (वय २४) २३ सप्टेंबरला रात्री दहाला बिलाल चौकात उभा होता. समीर हमीद काकर तेथे आला व त्याने दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केले. पैसे दिले नाहीत, म्हणून त्याने काही एक न बोलता धारदार ब्लेडने मानेवर वार केला. (Young Man ear cut off for not paying for alcohol Jalgaon News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Crime News
Jalgaon News : गोवरचे 172 संशयित रुग्ण; 9 महिने ते 5 वर्षीय बालकांना लसीकरण

मात्र, थोडक्यात अरबाज सावध झाल्याने त्याचा कान कापला गेला. जखमी अवस्थेत त्याला जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीच्या जबाबावरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून अट्टल गुन्हेगार असलेला समीर हमीद काकर फरारी झाला होता.

सोमवारी (ता. १९) समीर काकर तांबापुरात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यावरून सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, नितीन पाटिल, इम्रान सय्यद, सुधीर साळवे, सचिन पाटील यांनी समीर काकर याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध आजवर ११ गंभीर गुन्हे दाखल असून, गुन्हा केल्यावर तो अनेक महिने पळून जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Crime News
धक्कादायक! निवडणूक निकालानंतर तुफान राडा; दगडफेकीत 25 वर्षीय भाजप कार्यकर्ता ठार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com