
जळगाव : महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; तरुणाचा मृत्यू
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच असून सलग दुसऱ्या दिवशीही अपघात होऊन तरुणाचा बळी गेला. तरसोद फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. (Latest Marathi News)
चाळीसगाव तालुक्यातील नायडोंगरी येथील मूळ रहिवासी हरिओम धनाजी पाटील (वय ३८, ह.मु. श्रध्दा कॉलनी, गोदावरी चक्कीजवळ) हा तरुण आई-वडिलांसह वास्तव्याला आहे. बांधकामाचे साहित्य पुरविण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी (ता. २८) रात्री १० वाजेच्या सुमारास दुचाकीने जळगावहून नशिराबादकडे जात होता. यादरम्यान वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हरिओमचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
हेही वाचा: पावसामुळे कोसळली घराची भिंत; ७ मुले ढिगाऱ्याखाली दबली, दोघांचा मृत्यू
नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. शुक्रवारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई दगूबाई, वडील धनाजी गंधार पाटील आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
हेही वाचा: लॅपटॉपवर काम केल्याने डोळ्यांना त्रास होतो? मग करा ‘हे’ घरगुती उपाय
Web Title: Young Man Killed In Accident On Highway At Jalgaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..