Latest Marathi News | जळगाव : पाय घसरून पडल्याने तरुण गिरणेच्या प्रवाहात गेला वाहून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Man drowning in girna river

जळगाव : पाय घसरून पडल्याने तरुण गिरणेच्या प्रवाहात गेला वाहून

जळगाव : गिरणा नदीच्या पुलावरून पायी घरी जात असलेल्या आव्हाणी येथील तरुणाचा पाय घसरून पडल्याने पाण्यात वाहून गेल्याची दुदैवी घटना सायंकाळी आव्हाणी येथे घडली. रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. संदीप बाजीराव पाटील (वय ४०, रा. आव्हाणी, ता. धरणगाव) असे पाण्यात बुडून वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. (Latest Marathi News)

हेही वाचा: ट्रक मागे घेताना तरुणाला चिरडले; उपचरादरम्यान तरुणाचा मृत्यू

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संदीप पाटील हा आव्हाणी शिवारातील सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कामावर एका ठेकेदाराकडे कामाला होता. नेहमीप्रमाणे तो मंगळवारी (ता. २६) सायंकाळी पाचच्या सुमारास कामावरून गिरणा नदीच्या पुलावरून पायी जात होता. अचानक त्याचा पाय घसरल्याने तोल जाऊन पाण्यात पडल्याने तो गिरणा नदीच्या वाहत्या पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो पाण्यात बुडाला. हा प्रकार भोकनी ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने पाळधी पोलिस ठाण्याला कळविले. रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते.

हेही वाचा: थांबवा, निधीची कामे..नवीन पालकमंत्री येईपर्यंत!

Web Title: Young Man Slipped And Swept Away By The Stream Of Girna River

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaongirna river