जळगाव : कर्जबाजारी तरुणाने घेतला गळफास

कर्जबाजारीपणाला कंटाळून आहुजानगरातील ३९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या
Suicide
Suicide sakal

जळगाव : कर्जबाजारीपणाला कंटाळून आहुजानगरातील ३९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अविनाश उर्फ बाळू बोरसे (वय ३९, रा. सुकृती अपार्टमेंट, आहुजानगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अविनाश ऊर्फ बाळू अरूण बोरसे हा पत्नी व मुलांसह आहुजानगरातील संस्कृती अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे. काही दिवसांपासून अविनाश बोरसे यांची पत्नी बाहेरगावी गेली होती. परिणामी अविनाश घरी एकटाच होता. शनिवारी (ता. १२) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अविनाशची आई सुनंदाबाई यांनी फोन लावण्याचा भरपूर प्रयत्‍न केला. परंतु फोन लागत नव्हता म्हणून त्यांनी भाचा प्रशांत पाटील यांना याची माहिती दिली. प्रशांत पाटील हा घरी गेला असता अविनाशचा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याने बाल्कनीमधून डोकावून पाहिले असता अविनाशने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले. अविनाशने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात ‘मी कर्जबाजारी झालेला असल्याने स्वत:च्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करत आहे’ असे नमूद केल्याचे आढळून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com