Jalgaon News : पोलिसांत तक्रार दिल्याने तरुणास मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beating

Jalgaon News : पोलिसांत तक्रार दिल्याने तरुणास मारहाण

जळगाव : पोलिसांत दिलेली तक्रार मागे घ्यावी, यासाठी घरासमेार उभा असलेल्या तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केली. (young man was beaten for reporting to police jalgaon crime news)

सुप्रीम कॉलनीत राहुल नवल राठोड घराबाहेर उभा असताना, आकाश सतीश काळे हातात दांडके घेऊन आला व त्याने राहुल याला मारहाण करण्यास सुरवात केली. सोबतच त्याचा भाऊ मनीष, थमकीबाई, सतीश काळे यांनीही राहुलला बेदम मारहाण करून ठार माण्याची धमकी दिली.

गंभीर जखमी अवस्थेत राहुल यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या जबाबावरून चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

दुसऱ्या गटातील मनीष काळे याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्याचा भाऊ आकश व गोलू नवल सगणे यांच्यात मस्करीवरून भांडण झाले होते. त्यावरून गोलूसह चमकाबाई, बाळू धाडी यांनी लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. त्यावरून गुन्ह्याची नोंद झाली आहे.

टॅग्स :JalgaonpolicecrimeBeating