
Jalgaon News : स्कूटी घसरून जखमी तरुणीचा मृत्यू
जळगाव : महामार्गावरून जात असताना, दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी (Injured) झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (young woman who was seriously injured in an accident due to a fall of two wheeler died jalgaon news)
पूनम सुनील विसपुते (वय २७, रा. आशाबाबानगर), असे मृत तरुणीचे नाव आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात तब्बल चार दिवस या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरू होती. आशाबाबानगरमध्ये पूनम विसपुते परिवारासह वास्तव्याला होती.
पूनम शहरातील एका खासगी जीममध्ये सेल्स मॅनेजर होती. महामार्ग दुरुस्ती सुरू असून, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर खोदकाम केले आहे. या खोदकामाच्या ठिकाणी पूनमची दुचाकी घसरून अपघात झाला होता. या अपघातात पूनम गंभीर जखमी झाली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
तिला रुग्णालयात हलविल्यानंतर सलग चार दिवसांपासून तिचा जीव वाचविण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, मेंदूला इजा झाल्याने तिची मृत्यूशी झुंज अखेर संपली. मृत पूनमच्या पश्चात वडील, भाऊ आणि मोठी बहीण असा परिवार आहे. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.