Tue, October 3, 2023

Jalgaon News : पाण्यात बुडून तरूणाचा मृत्यू
Published on : 5 June 2023, 9:57 am
Jalgaon News : वसंतनगर (ता. पारोळा) येथील पंकज विष्णू जाधव (वय १९) या तरुणाचा विहिरीत पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत नितीन जाधव यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिली.
पंकज हा रविवारी (ता. ४) दुपारी चारच्या सुमारास भोलाणे शिवारातील शेतातील विहिरीत पाण्यात बुडत असल्याचे नातेवाईकांना व ग्रामस्थांना आढळले. (Youth death by drowned in water Jalgaon News)
त्यांनी त्याला तत्काळ बाहेर काढून पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
याबाबत पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, सहायक फौजदार इक्बाल शेख तपास करत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?