Business Idea For Women : कमी भांडवलात मोठा फायदा, महिलांसाठी नोकरी ऐवजी उत्तम पर्याय

अनेक लोक नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करतात. अशा वेळी तुम्ही व्यवसायातून अधिक कमाई करू शकतात.
Business Idea For Women
Business Idea For Womenesakal

Business Idea For Women : जर तुम्ही नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. या व्यवसायासाठी तुम्हाला भांडवल कमी लागणार आहे. हा व्यवसाय महिला घरात बसून करू शकतात.

जर तुम्हाला सजावटीची आवड आणि दृष्टी असेल तर गिफ्ट बास्केट बनवण्याचा व्यवसाय उत्तम पर्याय ठरू शकतो. यातून चांगले उत्पन्न मिळू शकते व ऑफीस, दुकान भाडे घेण्याची गरज नसून घरच्या घरी हा व्यवसाय करणं सहज शक्य आहे.

आजच्या काळात लोकांना विशेष प्रसंगी बास्केट खरेदी करायला आणि भेट द्यायला आवडते. त्यामुळे बाजारात अशा गिफ्ट बास्केट्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. वाढदिवस, वर्धापन दिन, सणवार किंवा कोणताही शुभ प्रसंग असला की, प्रामुख्याने शहरात अशा गिफ्ट बास्केट्सची सध्या चलती आहे.

गिफ्ट बास्केटचा व्यवसाय म्हणजे काय?

एकाच बास्केटमध्ये (टोपलीत) विविध प्रकारच्या वस्तू असतात. त्याला क्रिएटीव्ह पद्धतीने पॅक करून गिफ्ट दिले जाते. ही बास्केट तुम्ही घरी सहज बनवू शकतात. यात वेगवेगळे प्रकार, वस्तू आणि किंमतीच्या बास्केट्स बनवता येतात.

हल्ली अनेक कंपन्यांनी गिफ्ट बास्केट्स बनवण्याची सुरुवात केली आहे. काळानुरुप गिफ्ट पॅकिंगच्या क्षेत्रात बरेच बदल झाले आहे. यात गुंतवणुक फार कमी आहे. हा व्यवसाय ५ ते ८ हजार रुपयांमध्ये सुरू करता येऊ शकतो. एवढ्या भांडवलात व्यवसायाशी निगडीत सर्व गरजा पूर्ण होतील.

Business Idea For Women
Summer Business : सिन्नरला उन्हाळ्यामुळे गरिबांच्या फ्रिजला मागणी! 200 ते 350 रुपयांपर्यंत माठ उपलब्ध

गिफ्ट बास्केटसाठी आवश्यक सामग्री

  • गिफ्ट बास्केट

  • बॉक्स रिबन

  • रॅपिंग पेपर

  • स्थानिक कला, हस्तकला साहित्य

  • साजावटीचं साहित्य

  • दागिन्यांचे तुकडे,

  • पॅकेजिंग साहित्य

  • स्टिकर फॅब्रिक तुकडा

  • पातळ वायर

  • कात्री

  • वायर कटर

  • मार्कर पेन

  • पेपर श्रेडर

  • कार्टन स्टेप्लर

  • डिंक

  • कलरींग टेप

Business Idea For Women
Instagram Business : इंस्टाग्रामवर बिजनेस कसा सुरु कराल? या काही सोप्या टिप्स कामी येतील

विक्री कशी करावी?

  • गिफ्ट बास्केट व्यवसायाचे मार्केटिंग करण्यासाठी एक बास्केट नमून्यासाठी तयार करून जवळच्या बाजारपेठेच्या मोठ्या दुकानदारांना दाखवावी.

  • ऑनलाइन व्यवसायासाठी अपेक्षित वेबसाइटवर फोटो अपलोड करून मार्केटिंग करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com