esakal | Govt Jobs : 10 वी पास ते पदवीधरांसाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

JOBS

Govt Jobs : 10 वी पास ते पदवीधरांसाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज

sakal_logo
By
टींम ई सकाळ

भारतीय हवाई दलाने (IAF) वेगवेगळ्या हवाई दलाच्या युनिट्ससाठी भारतीय नागरिकांचे ग्रुप 'C' सिविलियन पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत लोअर डिव्हिजन लिपिक (LDC), स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), HKS, आया, वार्ड सहायिका, वॉशरमन आणि मेस स्टाफ इत्यादी पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी 10 वी पास ते पदवीधर सर्व पात्र उमेदवार 23 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. या नोकरीसाठीची पात्रता काय आहे आणि अर्ज कसा करावा याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

ही एकूण पदे

ग्रुप 'C' नागरी पदे: एकूण 85 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता

कुक - डिप्लोमासह 10 वी उत्तीर्ण किंवा केटरिंगमध्ये प्रमाणपत्र आवश्यक आहे.

पेंटर - 10वी पास असण्यासोबतच पेंटिंग ट्रेड मध्ये आयटीआय झालेला असणे आवश्यक आहे.

कारपेंटर - संबंधित ट्रेड मध्ये ITI सह 10 वी उत्तीर्ण.

हाऊस कीपिंग स्टाफ - 10 वी पास.

मेस स्टाफ - 10 वी पास.

एमटीएस - दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर - 10 वी पास आणि लाईट आणि सिव्हिलियन हेवी व्हेइकल चालवण्याचा परवाना.

लोअर डिव्हिजन लिपिक- बारावी पास. संगणकावर किमान 35 शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टाइप करण्याची गती.

हिंदी टंकलेखक - 12 वी पास आणि संगणकावर हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टाइपिंग गती आवश्यक आहे.

स्टोअर कीपर- 12 वी पास.

स्टोअर सुपरिटेंडेंट - पदवी पूर्ण केलेली असावी. स्टोअर आणि खाती हाताळण्याचा अनुभव आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा:

पात्र उमेदवारांना या पदांसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागेल. उमेदवारांना त्यांचे अर्ज पोस्टाद्वारे संबंधित हवाई दल स्टेशन किंवा युनिटला पाठवावे लागतील. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार 24 जुलै 2021 च्या रोजगार वृत्तपत्र पाहू शकतात.

हेही वाचा: मुक्त विद्यापीठाच्या बीए, बीकॉम ऑनलाईन परीक्षा वेळापत्रकात बदल

हेही वाचा: स्टीव्ह जॉब्स यांच्या पहिल्या जॉब अ‍ॅप्लिकेशनची तब्बल २.५ कोटींना विक्री

loading image
go to top