Indian Railways Jobs: भारतीय रेल्वेमध्ये 2.5 लाख पदं रिक्त; सरकारनं संसदेत दिली माहिती

यामध्ये सर्वाधिक रिक्तपदं ही 'गट क'मधील नोकऱ्यांसंबंधीची पदं आहेत.
Railway Jobs
Railway Jobsesakal

नवी दिल्ली : भारताय रेल्वेमध्ये तब्बल २.५ लाख पदं रिक्त असल्याची माहिती केंद्र सरकारनं सोमवारी संसदेत दिली. यांपैकी सर्वाधिक रिक्तपदं ही 'गट क' नोकऱ्यांशी संबंधित आहेत. भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्निनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. (Indian Railway Jobs 2.5 Lakh Vacancies in Indian Railways Modi govt gave answer in parliament)

Railway Jobs
CA Foundation Result: सीए फाऊंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या उत्तर विभागात सर्वाधिक 32,468 पदं रिक्त आहेत. त्यानंतर पूर्व विभागात 29,869, पश्चिम विभागात 25,597 आणि मध्य विभागात 25,281 पदं रिक्त आहेत. तसेच, गट 'अ' आणि 'ब' मधील एकूण 2,070 पदं रिक्त आहेत. अशा सर्व गटातील मिळून रिक्त पदांची एकूण संख्या २,५०,९६५ वर पोहोचली आहे. (Latest Marathi News)

Railway Jobs
धक्कादायक! प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या 80 महिला HIV पॉझिटिव्ह; 35 जणींनी दिला बाळाला जन्म

30 जून 2023 पर्यंत 1,28,349 उमेदवारांना 'गट क' पदांवर (स्तर-1 वगळून) अधिसुचनेशिवाय नियुक्त केलं आहे. तर 1,47,280 उमेदवारांना लेव्हल-1 पदांसाठी नियुक्त करण्यात आलं आहे. भारतीय रेल्वेत 'गट अ' सेवांमध्ये थेट भरती मुख्यत्वे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे केली जाते, अशी माहितीही यावेळी वैष्णव यांनी दिली. (Marathi Tajya Batmya)

Railway Jobs
News Click वर भाजपचे गंभीर आरोप; काँग्रेस चीनसोबत भारतविरोधी अजेंडा राबवत असल्याचा केला दावा

1 डिसेंबर 2022 पर्यंत देशभरात रिक्त असलेल्या 3.12 लाख अराजपत्रितपदांच्या तुलनेत रेल्वेच्या सध्याच्या एकूण रिक्तपदांची संख्या 2.5 लाख इतकी कमी आहे. देशातील सर्वात मोठा कर्मचाऱ्यांची संख्या असलेला केंद्रीय विभाग म्हणून रेल्वेची ओळख आहे. 1 फेब्रुवारी 2023 पर्यंत रेल्वेमध्ये एकूण 11.75 लाख कर्मचारी होते, असंही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सविस्तर उत्तर देताना सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com