esakal | रेल्वेत 1664 पदांसाठी भरती; आठवी पास देखील करू शकतात अर्ज!
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Railway

रेल्वे भरती सेल, (RRC) उत्तर मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी देशभरातील उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

रेल्वेत 1664 पदांसाठी भरती; आठवी पास देखील करू शकतात अर्ज!

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

Indian Railways Recruitment 2021 : रेल्वे भरती सेल, (RRC) उत्तर मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी देशभरातील उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. यासाठी इच्छुक उमेदवार केवळ rrcpryj.org वर RRC च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. उत्तर मध्य रेल्वेने प्रयागराज, आग्रा, झाशी आणि झाशी वर्कशॉपसह विविध विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या 1,664 रिक्त पदांच्या जागांसाठी अर्ज मागवत असल्याची अधिसूचनाही जारी केलीय.

Indian Railways Recruitment 2021 : रिक्त पदांचा तपशील

  • प्रयागराज विभाग : यांत्रिक आणि विद्युत विभागात 703 रिक्त जागा

  • आग्रा विभाग : 296 जागा

  • झाशी विभाग : 480 जागा

  • झाशी कार्यशाळा विभाग : 185 जागा

हेही वाचा: NTA JEE Main 2021 : NTA लवकरच प्रवेशपत्र जारी करणार

Indian Railways Recruitment मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे इतके असावे. दरम्यान, उमेदवारांचे वय 1 सप्टेंबर 2021 पासून मोजले जाईल, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट दिली जाईल. वयोमर्यादेबद्दल संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पहावी.

हेही वाचा: UPSC च्या Geo Scientist मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर

प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी किमान 50% गुणांसह 10+2 प्रणालीमध्ये मॅट्रिक (वर्ग 10) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ट्रेड वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), वायरमन आणि सुतार यांच्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता आयटीआय प्रमाणपत्रासह 8 वी उत्तीर्ण असावी. तर SC, ST, PWD किंवा महिला उमेदवारांना अर्ज फी भरावी लागणार नाही. इतर उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 200 रुपये भरावे लागतील. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2021 आहे.

loading image
go to top