NTA JEE Main 2021 : NTA लवकरच प्रवेशपत्र जारी करणार

NTA JEE Main
NTA JEE Mainesakal

NTA JEE Main 2021 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य मे (सत्र 4) साठी प्रवेशपत्र जारी करणार आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला आहे, ते अधिकृत वेबसाइटला jeemain.nta.nic.in भेट देऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

Summary

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य मे (सत्र 4) साठी प्रवेशपत्र जारी करणार आहे.

7.32 लाख उमेदवारांनी केला अर्ज

जेईई मेन 2021 चे चौथे आणि शेवटचे सत्र मूळतः मे महिन्यात होणार होते. परंतु, कोरोना महामारीमुळे ते पुढे ढकलण्यात आले. आता ही परीक्षा 26, 27, 31 ऑगस्ट, तर 1 आणि 2 सप्टेंबर रोजी घेण्यात येईल. जेईई (मुख्य) 2021 सत्र 4 साठी 15 जुलैपर्यंत एकूण 7.32 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते.

NTA JEE Main
नोकरीची संधी! 'इंडियन ऑईल'मध्ये 480 पदांसाठी भरती

NTA JEE Main 2021 : असे करा 'Admit Card' डाउनलोड

  • स्टेप 1 : प्रथम अधिकृत वेबसाइटला jeemain.nta.nic.in भेट द्या.

  • स्टेप 2 : 'Admit Card' लिंकवर क्लिक करा.

  • स्टेप 3 : लॉगिन करण्यासाठी तुमचा नोंदणीकृत आयडी आणि जन्मतारीख समाविष्ट करा.

  • स्टेप 4 : आता जेईई मेन प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.

  • स्टेप 5 : ते डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

NTA JEE Main
भारतीय लष्करात बंपर भरती; तब्बल 28 हजार जागा भरणार

जेईई मेन 'सत्र 3'चा असा होता 'निकाल'

NTA ने 6 ऑगस्ट रोजी JEE सत्र तीनचा निकाल जाहीर केला होता. जेईई मेन परीक्षा 20, 22, 25 आणि 27 जुलै रोजी यशस्वीपणे आयोजित केली गेली. जेईईमध्ये एकूण 17 उमेदवारांनी 100% गुण मिळवले होते. यंदा ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, गुजराती, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या 13 भाषांमध्ये घेतली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com