esakal | खुशखबर! BSF मध्ये 285 जागांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

BSF Recruitment 2021

खुशखबर! BSF मध्ये 285 जागांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

BSF Recruitment 2021 : सीमा सुरक्षा दलाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर एअर विंग, पीएमएस आणि वेटेरिनरी अशा विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. इच्छुक उमेदवार, या पदांसाठी अधिकृत वेबसाइटवर (rectt.bsf.gov.in 26) जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. BSF Recruitment 2021 च्या माध्यमातून एकूण 285 पदे भरती जाणार आहेत. यामध्ये सहाय्यक एअरक्राफ्ट मेकॅनिक 49 पदे, सहाय्यक रेडिओ मेकॅनिक 8 पदे, कॉन्स्टेबल 8 पदे, स्टाफ नर्स 74 पदे, एएसआय ऑपरेशन थिएटर टेक्निशियन 2 पदे, एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञची 56 पदे, विसल 18 पदे, एचसी 40 (Veterinary) आणि कॉन्स्टेबलची (कॅनेलमॅन) 30 पदे भरण्यात येणार आहेत. (BSF Recruitment 2021 Apply Online For 285 Posts Before 26 July Check Details Here)

BSF Recruitment 2021 साठी असा करा अर्ज

स्टेप 1 : सर्व प्रथम सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइटला rectt.bsf.gov.in भेट द्या.

स्टेप 2 : आपल्यासमोर भरतीसाठीच्या तीन लिंक दिसतील.

स्टेप 3 : उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहे, त्या पोस्टच्या दुव्यावर क्लिक करावे.

स्टेप 4 : आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

स्टेप 5 : आता सर्व आवश्यक माहिती भरा आणि सबमिट बटणावरती क्लिक करा.

हेही वाचा: 'JEE Main'च्या तिसर्‍या सत्रासाठी 15 जुलैला जाहीर होणार Admit Card!

या पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी व बारावी उत्तीर्ण असावी. दरम्यान, उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक चाचणी (PST) च्या आधारे केली जाईल. BSF Recruitment 2021 साठी उमेदवार 26 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. याबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकतात.

BSF Recruitment 2021 Apply Online For 285 Posts Before 26 July Check Details Here

loading image