esakal | Indian Post : पोस्टात 'या' पदांसाठी मोठी भरती; महिन्याला मिळणार 'इतका' पगार
sakal

बोलून बातमी शोधा

India Post

'भारतीय पोस्ट'च्या माध्यमातून ग्रामीण डाक सेवक पदासाठी रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

Indian Post : पोस्टात 'या' पदांसाठी मोठी भरती

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

India Post Recruitment 2021 : भारतीय पोस्टात नोकरीकरिता इच्छुक असलेल्यांसाठी ही महत्वाची बातमी! इंडिया पोस्ट, पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ग्रामीण डाक सेवक पदाकरिता भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून इच्छुक उमेदवार या पदाच्या भरतीसाठी indiapost.gov.in‌ किंवा appost.in/gdsonline वर 19 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरू करण्यात आलीय.

India Post Recruitment च्या माध्यमातून ग्रामीण डाक सेवकच्या (GDS) 2357 रिक्त पदांची भरती केली जाईल. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 10,000 ते 12000 रुपये वेतन दिले जाईल. मात्र, अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला स्थानिक भाषा, संगणक इत्यादीचे ज्ञानही असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. दरम्यान, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वरच्या वयोमर्यादेत शिथिलता दिली जाणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण डाक सेवक पदावरील भरतीसाठी उमेदवारांची निवड केवळ गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.

हेही वाचा: ‘सीईटी’च्या अर्जासाठी मुदतवाढ

याशिवाय, इंडिया पोस्टने पंजाब पोस्टल सर्कलमध्ये भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या प्रक्रियेद्वारे 57 पदांची भरती केली जाईल. ज्यामध्ये पोस्टल असिस्टंटची 45 पदे, सॉर्टिंग असिस्टंटची 9 पदे आणि मल्टी टास्किंग स्टाफची 3 पदे भरली जातील. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. इच्छुक उमेदवार 18 ऑगस्टपर्यंत विहित नमुन्यात ऑफलाइन मोडद्वारे पंजाब पोस्टल सर्कलवर अर्ज करू शकतात. उमेदवाराने अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

loading image
go to top