esakal | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक भरती; २ सप्‍टेंबरपर्यंत करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Job News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक भरती; २ सप्‍टेंबरपर्यंत करा अर्ज

sakal_logo
By
अरुण मलाणी

Recruitment of Assistant Professor in Government Medical College : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ‘ब’ संवर्गातील भरती केली जात आहे. यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शुक्रवारी (ता. १३) सूचनापत्र जारी केले. या अंतर्गत २२ विषयांतील ७२१ पदांसाठी इच्‍छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २ सप्‍टेंबरपर्यंत मुदत असेल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जारी केलेल्‍या सूचनापत्रात विषयांसह आरक्षणांचा सविस्‍तर तपशील नमूद केला आहे. निवड झालेल्‍या उमेदवाराला किमान पाच वर्षे सेवा करणे बंधनकारक असून, तशा आशयाचे करारपत्र करावे लागणार आहे. वयाची अट व अन्‍य अटी-शर्तींचा तपशील सूचनापत्रात आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी २ सप्‍टेंबरपर्यंत मुदत असेल. अर्जासोबत शैक्षणिक आर्हता, अनुभवाच्या पुराव्‍यासह आरक्षणासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

सामान्‍य वैद्यकशास्‍त्र, अस्‍थिव्‍यंगोपचारशास्‍त्र, कान-नाक व घसाशास्‍त्र, सामान्‍य शल्‍यचिकित्‍सा शास्‍त्र, प्रसूतिशास्‍त्र व स्‍त्रीरोगशास्‍त्र, बालरोग चिकित्‍साशास्‍त्र, मनोविकृती चिकित्‍साशास्‍त्र, शरीररचना शास्‍त्र, क्षयरोगशास्‍त्र व उरोरोगशास्‍त्र अशा एकूण २२ विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक पद भरतीसाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे.

हेही वाचा: व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर, प्रोफाइल पिक्चरवर टॅप करुन दिसणार स्टेटस

हेही वाचा: टाटाची जिओला टक्कर, सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस होतेय लाँच

loading image
go to top