टाटाची जिओला टक्कर, सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस होतेय लाँच

TATA Satellite Internet Service
TATA Satellite Internet ServiceGoogle

TATA Satellite Internet Service : जगात भारतातील स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर सर्वाधिक होतो. या दरम्यानच कोरोना महामारीमुळे डेटाचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे, वर्क फ्रॉम होम ते ऑनलाईन शिक्षणापर्यंत सर्व गोष्टी इंटरनेटच्या वापरातून होत आहेत. याचाच परिणाम म्हणून इंटरनेटच्या क्षेत्रात अनेक नवीन कंपन्याही बाजारात दाखल होत आहेत.

काही दिवसांपुर्वी Elon Musk यांची स्टारलिंक (Starlink) बाजारात दाखल झाली. मस्कने स्टारलिंक सेवेसाठी प्री-बुकिंगही सुरू केले आहे. त्याचबरोबर आता टाटा समूह (Tata Group) देखील मोबाईल आणि इंटरनेटच्या या बाजारात पाऊल टाकत आहे. टाटा कंपनीच्या या हालचालीमुळे केवळ स्टारलिंकच नाही तर मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओलाही (Reliance Jio) फटका बसू शकतो. आज आपण याच TATA च्या सॅटेलाइट इंटरनेट सर्विस बद्दल जाणून घेणार आहोत.

टाटा सॅटेलाईट इंटरनेट सेवा

टाटा समूहाने (Tata Group) काही काळापूर्वी सेमीकंडक्टर तयार करण्याची घोषणा केली होती. हे सेमीकंडक्टर मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी वापरला जाणार आहे. याशिवाय टाटा कंपनी 5G लाँच करण्यावरही काम करत आहे. त्याचबरोबर समुहाकडून घोषणा करण्यात आली आहे की टाटा ग्रुप लवकरच ब्रॉडबँड सेवा देखील सुरू करू शकतो जी सॅटेलाईट इंटरनेटवर आधारित आहे. टाटा समूह टेलिसॅटच्या संपर्कात असून 2024 पर्यंत ही सेवा सादर केली जाऊ शकते.

TATA Satellite Internet Service
टेक्नोहंट : ‘मेटावर्स’ची आभासी दुनिया

एलॉन मस्क आणि जीओला देणार टक्कर

जिओ फायबरची (Jio Fiber ) सध्या बाजारात बरीच चर्चा होत आहे. वापरकर्ते त्याच्या स्पीड आणि सर्विसबद्दल खूप खूश आहेत. तसेच जीओकडून ही सेवा प्रत्येक वापरकर्त्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचवेळी, इलॉन मस्कच्या स्टारलिंक सेवेची घोषणा काही काळापूर्वी करण्यात आली होती. लवकरच ते भारतात देखील लॉन्च करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत, आता टाटा समूह देखील या क्षेत्रात उतरत आहे, तर जिओ अर्थात मुकेश अंबानी आणि स्टारलिंक अर्थात एलोन मस्कच्या समस्या वाढू शकतात. दरम्यान टाटा समूहाची इंटरनेट सेवा सुरू झाल्यानंतर वापरकर्त्यांना अनेक जबरदस्त आणि परवडणारे प्लॅन्स पाहायला मिळू शकतात.

TATA Satellite Internet Service
VI चा RedX फॅमिली प्लॅन, अनलिमिटेड डेटासह मिळेल बरेच काही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com